![]()
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला आता अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप मिळणार आहे. या योजनेत खासगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील भाविकांना अत्यंत किफायतशीर दरात सुरक्षित तीर्थयात्रा करता येणार असून, एसटीच्या उत्पन्नालाही मोठा हातभार लागणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. एकाच तिकिटात निवास, भोजन अन् गाड्यांची सुविधा
नव्या धोरणानुसार, तीर्थयात्रेदरम्यान भाविकांना लागणाऱ्या सर्व पूरक सुविधा आता ‘वन-स्टॉप’ पद्धतीने मिळतील. ६ प्रादेशिक पर्यटन संस्थांची होणार निवड; २ वर्षांचा पायलट प्रोजेक्ट या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निविदा (RFP) प्रक्रियेद्वारे राज्याच्या ६ वेगवेगळ्या प्रदेशांसाठी प्रत्येकी एका, अशा एकूण ६ अनुभवी पर्यटन संस्थांची निवड केली जाईल. सुरुवातीला हा प्रकल्प २ वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Basis) राबवला जाणार आहे. या संस्थांना प्रसिद्धीसाठी एसटीचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगीही दिली जाईल. मराठी तरुण-तरुणींसाठी सुवर्णसंधी!
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील तरुण-तरुणींना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “कोणतीही मोठी भांडवली गुंतवणूक न करता, केवळ नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर मराठी युवक-युवती पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. रोजगार निर्मिती आणि स्वावलंबनाची ही मोठी संधी आहे,” असे ते म्हणाले. “भाविकांच्या श्रद्धेला सेवाभावाची जोड आणि एसटीच्या आर्थिक बळकटीला नवा आधार’ या दुहेरी उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देईल!”, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. हे ही वाचा.. नायराचे पेट्रोल ₹5, डिझेल ₹3 ने स्वस्त:भोपाळमध्ये 1 लिटर पेट्रोल ₹120, डिझेल ₹103 ला मिळेल; कच्चे तेल स्वस्त झाल्याने दिलासा देशातील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात केली आहे. या कपातीनंतर आता भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत 119.79 रुपये आणि डिझेलची किंमत 102.57 रुपये झाली आहे. नायराचे देशभरात 7 हजार पेट्रोल पंप, हिस्सा 7% इतर कंपन्यांच्या मालकीच्या १,००,००० हून अधिक पंपांच्या तुलनेत, नायरा एनर्जी देशभरात ७,००० हून अधिक पेट्रोल पंप चालवते; यामुळे बाजारात त्यांचा ७% हिस्सा आहे. नायराचे नवीन दर देशभरात लागू झाले आहेत. तथापि, विविध राज्यांमधील स्थानिक कर आणि मूल्यवर्धित कर (व्हॅट) दरांमधील फरकामुळे शहरांनुसार किरकोळ दरांमध्ये थोडाफार फरक असू शकतो. सविस्तर वाचा
Source link
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय:'तीर्थाटन' योजनेत आता खासगी भागीदारी; मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी, प्रवाशांना एकाच तिकिटात सर्व सुविधा