आषाढी वारीत आशा स्वयंसेविकांमार्फत आरोग्य जनजागृती:आरोग्य विभागाच्या सूचना, निरोगी वारी सुरक्षित वारीचा संदेश
आषाढी वारी-२०२६ दरम्यान लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्यातील आशा स्वयंसेविकांमार्फत व्यापक आरोग्य जनजागृती राबविण्याचे निर्देश आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संजय काटकर यांनी दिले आहेत. पंढरपूर आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वाचा सोहळा असून, या काळात मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. गर्दी, प्रवास, बदलते हवामान तसेच संसर्गजन्य…