अगोदर भाव ठरवा, नंतरच मोजणी:बिडकीन येथील बैठकीमध्ये ग्रीनफील्ड मार्गासाठी शेतकऱ्यांचा एल्गार
शेंद्रा ते पुणे (मार्गे बिडकीन) या ग्रीनफील्ड महामार्गाला शासनाकडून मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी जमीन मोजणीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, शासनाने अगोदर जमिनींचा बाजारभाव निश्चित करावा, त्यानंतरच मोजणी करावी, असा एल्गार बिडकीन आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पुकारला आहे. या संदर्भात बिडकीन येथे शेतकऱ्यांची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे नियोजन अॅड. संचित पातुनकर यांनी…