आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे
गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली…मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची कामे देण्यासाठी पायघड्या का अंथरल्या जात आहेत? संबंधित ठेकेदारासोबत साटंलोटं आहे का? असा ’बॉम्ब’ कुर्डुचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी ऐन जिल्हा परिषदेच्या…