मान्सूनची दिशा अन् दशा:शहरावर दाटले ढग, दमटपणा वाढला पण पाऊस काही बरसेना
शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून हवेत कमालीचा दमटपणा जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यात केवळ १.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सकाळी सापेक्ष आर्द्रता ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. किमान तापमान २४.३ अंश…