Headlines

Admin

धक्कादायक घटना:अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करुन केला व्हिडीओ; गुन्हा दाखल

एका १४ वर्ष सात महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या कृत्याचा व्हिडीओसुद्धा काढण्यात आला. याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास विहीरीत टाकण्याची धमकीसुध्दा पिडीत मुलाला दिली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १०) मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून समोर आली. या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये एका विधिसंघर्षित बालकाचा…

Read More

अहमदाबाद विमान अपघाताला एक वर्ष:वाचलेल्या एकमेव व्यक्तीने म्हटले- आम्हाला हे जाणून घेण्याचा हक्क, त्या दिवशी काय झाले होते

‘12 जून 2025 च्या त्या मनहूस दिवसाला पूर्ण वर्ष झाले. पण माझ्यासाठी वेळ तिथेच थांबली आहे. लोक मला ‘चमत्कारी’ म्हणतात, कारण अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच जेव्हा एअर इंडियाचे बोइंग 787 ड्रीमलाइनर क्रॅश झाले, तेव्हा त्यात असलेल्या 260 लोकांपैकी फक्त मी एकटाच जिवंत वाचलो होतो. पण खरे सांगायचे तर, या जिवंत राहण्याची किंमत मी दररोज माझ्या…

Read More

अन्नदात्यासाठी अन्नत्याग!:सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे आजपासून पंढरपुरात बेमुदत आंदोलन

महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आजपासून पंढरप पवित्र भूमीत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहेत. “सरकारने जाहीर केलेली ३५ हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक आहे. यातील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत, असा गंभीर आरोप करत रोहित पवारांनी विनाअट…

Read More

काम मिळवून देण्याच्या नावाखाली 20 लाख रुपये लुटले:नोरा फतेही म्हणाली- माझी खिल्ली उडवली गेली, ‘दिलबर’ सारखी अनेक गाणी फुकट केली

मुंबईच्या झगमगाटामागे फसवणूक, टोमणे आणि संघर्षाची एक लांब कहाणीही दडलेली आहे. नोरा फतेहीचे आयुष्यही असेच होते, जिथे काम मिळवून देण्याचे आश्वासन देऊन 20 लाख रुपये लुटले गेले आणि अनेकदा तिला फीशिवाय गाणी करावी लागली. “माझी खिल्ली उडवली गेली, दिलबरसारखी अनेक गाणी फुकट करावी लागली” – हा काळ तिची ओळख बनण्यापूर्वीच्या संघर्षाला दर्शवतो. कॅनडाहून मुंबईत आलेल्या…

Read More

वारसा संवर्धन:महादेव विहिर संवर्धनासाठी 1.80 कोटी निधी मंजूर; ‘ब्रह्मदेव’ मूर्तीचे होणार जतन

ऐतिहासिक नगरी मंगळवेढ्यातील प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आता महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. येथील काशी विश्वनाथ मंदिराजवळील ऐतिहासिक महादेव विहिरीत (पुष्करिणी) शतकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या १२ व्या शतकातील दुर्मिळ ब्रह्मदेव मूर्तीचे जतन आणि सुशोभीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासकीय व वैयक्तिक स्तरावर मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. तसेच या महादेव विहिरीचे संवर्धन व जतन करण्यासाठी १…

Read More

दैनंदिन जीवनामध्ये मैदानी खेळांचे महत्व- किशोर गांधी:बॉलर्स क्लब बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राचे उत्साहात उद्घाटन‎

आनंदी व निरामय जगण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळ अत्यंत आवश्यक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या फिटनेस आणि क्रीडा संस्कृती संवर्धनासाठी बॉलर्स क्लबने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्रात चांगले खेळाडू घडतील असा विश्वास माजी क्रिकेटपटू किशोर गांधी यांनी व्यक्त केला. साईनगर, बुरूडगाव रोड परिसरात बॉलर्स क्लबने नव्याने सुरू केलेल्या बास्केटबॉल प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मैदानाचे पूजन…

Read More

दिल्लीतील हॉटेल आगीच्या घटनेत पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह:प्रभावशाली लोकांना वाचवण्यासाठी स्वयंपाक्याला 'बळीचा बकरा' बनवले, 23 बळी गेले

दिल्लीतील मालवीय नगर येथील ‘फ्लोरिस स्टे’ हॉटेलमधील आगीच्या घटनेच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक समाज, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचा आरोप आहे की, प्रभावशाली हॉटेल मालक, दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) आणि पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हॉटेलमधील 65 वर्षीय आचारी केशव सिंह नेगी यांना ‘बळीचा बकरा’ बनवले जात आहे. 3 जून रोजी झालेल्या…

Read More

नेवाशात उद्या रंगणार सोहळा:खंडोबारायांना सासुरवाडीतून धोंड्याचे जेवण; नेवाशात जपली जातेय परंपरा

नेवासे लग्नसमारंभासाठी जावयाला सासुरवाडीतून निमंत्रण जाणे ही तशी सर्वसामान्य बाब. मात्र, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या थेट जेजुरीच्या खंडोबारायांना त्यांच्या सासुरवाडीतून जेजुरीत जाऊन धोंडा भोजनाचे निमंत्रण देण्याची एक अनोखी आणि रंजक परंपरा नेवासे बुद्रुक येथे आजही मोठ्या भक्तीभावाने जपली जात आहे. अधिक पुरुषोत्तम मासनिमित्त शनिवारी (१३ जून) आयोजित धोंडा भोजन सोहळ्यासाठी खंडेरायांच्या चरणी नेवासेकरांच्या वतीने निमंत्रण…

Read More

Akshay Kumar Retirement Plan | Welcome to the Jungle Launch Mumbai

19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. मुंबईत गुरुवारी झालेल्या या कार्यक्रमात अक्षयने विनोदी शैलीत सांगितले की, त्याला कधीही निवृत्त व्हायचे नाही, कारण घरी बसल्यावर त्याला विजेचे काम किंवा कुत्रा फिरवण्यासारखी घरगुती कामे करावी लागतील. त्यांनी सल्ला दिला की, माणसाने…

Read More

मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव परिसरात भात लागवडीसाठी पावसाची प्रतीक्षा:पूर्वमशागतीची कामे पूर्ण; मान्सूनच्या पुढील समाधानकारक हजेरीकडे लक्ष‎

इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव परिसरात भात लागवडीपूर्वीची शेतीची तयारी पूर्ण झाली असून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच लागवडीच्या कामांना वेग येणार असल्याने बळीराजाचे लक्ष मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे . जून महिना सुरू होताच तालुक्यात खरीप हंगामातील कामांना सुरुवात होते. यंदाही शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, बांधबंदिस्ती तसेच लागवडीपूर्वीची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे….

Read More