Headlines

Admin

पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले चांगली गोष्टय:अजितदादांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा झाली; सुनील तटकरे काय म्हणाले?

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्यांचा अर्ज भरण्यात आला आहे. त्यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अजितदादा असताना झाल्याचेही म्हटले आहे. तसेच अजितदादांच्या विमान अपघातावरही भाष्य केले…

Read More

"वर्क फ्रॉम होम'चा फायदा घेत सफरचंदाचा यशस्वी प्रयोग:मिरी येथील शाहरुख शेख यांच्या शेतात भर उन्हाळ्यात सफरचंदाची फळधारणा

प्रतिनिधी | पाथर्डी “सफरचंद फक्त जम्मू-काश्मीरसारख्या थंड हवेच्या प्रदेशातच येते,” हा पारंपरिक गैरसमज पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील एका तरुण संगणक अभियंत्याने आपल्या यशस्वी प्रयोगातून दूर केला आहे. शाहरुख सादिक शेख (वय ३३) या प्रयोगशील आयटी इंजिनिअरने भर उन्हाळ्यात आपल्या शेतात ‘हरमन-९९’ या सफरचंदाच्या वाणाची लागवड करून फळधारणा मिळवली आहे. शाहरुख शेख हे ऑक्टोबर २०१५ पासून…

Read More

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या जयंती विशेषांकाचे चौंडी येथे प्रकाशन:लोककल्याणकारी राज्यकारभाराच्या स्मृतींना दिव्य मराठी'ने दिला उजाळा

प्रतिनिधी | अहिल्यानगर जामखेड तालुक्यातील चोंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन जन्मभूमीत रविवारी भक्ती आणि उत्साहाचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. अहिल्यादेवी यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित मुख्य सोहळ्यात ‘दै. दिव्य मराठी’च्या ‘३०१ वी जयंती विशेषांका’चे भव्य आणि थाटात प्रकाशन करण्यात आले. अथांग जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

Read More

शेवगावात ऐतिहासिक ३६० वा शिवअभिषेक सोहळा उत्साहात:सरसेनापतींचे वंशज संतोषकुमार दहातोंडे यांच्या हस्ते सोहळा; शिवअभिषेक समितीकडून विशेष गौरव‎

प्रतिनिधी | शेवगाव शेवगाव शहरात गेल्या आठ वर्षांपासून अखंडपणे दर शुक्रवारी वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते होणारा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा यंदा ऐतिहासिक ठरला. हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे वंशज संतोषकुमार दामोधर दहातोंडे यांच्या हस्ते यंदाचा ३६० वा साप्ताहिक शिवअभिषेक सोहळा उत्साहात झाला. काही वर्षांपूर्वी इतिहास संशोधनात फारसे परिचित नसलेल्या सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे नाव आणि…

Read More

पाळोदी येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:नापिकी अन कर्जाचे कारण, कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद

कळमनुरी तालु्क्यातील पाळोदी येथे अल्पभूधारक तरूण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात रविवारी ता. ३१ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील शेतकरी गजानन शिंदे (३५) यांना पाळोदी शिवारात चार एकर शेत आहे. या शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या…

Read More

वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण‎सुटल्याने कार एसटी बसला धडकली‎:वैजापूरच्या खंडाळा-कोल्ही शिवारात अपघात, कारमधील पाच जण जखमी‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा-कोल्ही शिवारात रविवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे येथून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने वैजापूरमार्गे जाणाऱ्या सिल्लोड-नाशिक बसला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून, दोन गंभीर आहे.सिल्लोड आगाराची बस (एमएच २० बीएल ३७७९) नाशिककडे जात होती. यावेळी वळणावर समोरून येणाऱ्या कारने (एमएच १२ एफके…

Read More

पाणीटंचाईला वैतागलेल्या शेतकऱ्याने‎मोसंबीच्या बागेवर फिरवला जेसीबी‎:कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीने हवालदिल झाले बागधारक‎

रब्बीच्या पेरणीला हातात पैसे नव्हते. पाऊस वेळेवर येईल म्हणून वाट पाहिली, पण त्याने दगा दिला. आणि जेव्हा आला, तेव्हा होत्याचे नव्हते करून गेला. निसर्गाच्या या लहरीपणाने एकाला हसवले तर दुसऱ्याला रडवले. गेल्या वर्षीच्या कापसाच्या भावाची कोंडी अजून फुटलेली नाही; उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न घटले. भूसार पिके हातची गेल्यावर मोसंबी तरी सुखाचे दिवस दाखवेल, या…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा त्याग, करारी बाणा अन् दूरदृष्टी अतुलनीय:मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श समोर ठेवावा, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा करारी बाणा, त्याग, दूरदृष्टी आणि शौर्य हे अतुलनीय होते. मुघलांच्या काळात अनेक हिंदू मंदिरांची पडझड होत असताना त्यांनी देशभरातील मंदिरांचे जतन, पुनर्बांधणी आणि विकास करण्याचे ऐतिहासिक कार्य केले. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याबरोबरच त्यांनी समाजकल्याणाला नेहमीच प्राधान्य दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी तलावांची निर्मिती, पाणी व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी कामांच्या माध्यमातून…

Read More

प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची टीका:म्हणाले- पक्षांतरासाठी विकासकामांचे ढोंग बंद करा; लखाणींच्या उमेदवारीवरही भाष्य

महाराष्ट्रात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली असून आज अर्ज भरण्यात येणार आहे. यात विशेष लक्ष वेधले गेले ते म्हणजे भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखणी यांना उमेदवारी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया…

Read More

पैठणमध्ये शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन:शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने

पैठण | प्रतिनिधी राज्यात वाढती महागाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी दर तसेच पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवारी पैठण शहरातील बसस्थानक चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करत विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सारंग यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

Read More