साताऱ्यात शरद पवार गटाचा एल्गार:महागाई, इंधन दरवाढ, पेपरफुटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा
वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेपरफुटीच्या घटना तसेच महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे मुख्य आकर्षण म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बैलगाडीतून केलेली प्रतीकात्मक एंट्री. इंधनाच्या वाढत्या किंमतींविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी हा…