Headlines

Admin

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दोन वर्षांपासून शेतात वीज खांब पडलेले:महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा, अपघाताची भीती

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना गावात शेतकरी प्रशांत शामराव वानखडे यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासून वीजेचे खांब जमिनीवर पडले आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतीकामात अडथळा येत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. वानखडे यांनी यासंदर्भात महावितरण कार्यालयाकडे अनेक वेळा अर्ज आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा त्यांचा…

Read More

वीज बिल वसुली करूनही कर्मचाऱ्यांना बोनस मिळेना:तिवस्यात 'कृती समिती' आक्रमक, काळ्या फिती लावून निषेध

तिवसा येथे महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न मिळाल्याने तीव्र आंदोलन केले. ‘महाराष्ट्र राज्य कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती’च्या वतीने तिवसा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आणि जोरदार घोषणाबाजी करत हा निषेध नोंदवण्यात आला. महावितरण प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिवाळी ते मार्च अखेरपर्यंतची वीज बिल थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यास बोनस देण्याचे…

Read More

ट्रोलिंगवर आलियाच्या समर्थनात समोर आली आई सोनी राजदान:म्हटले- सोशल मीडियावर खूप द्वेष; कान्समध्ये आलियाला दुर्लक्षित केल्याचा दावा

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2026 च्या रेड कार्पेटवरून अभिनेत्री आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली होती. या ट्रोलिंगवर आता आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खरं तर, लेखिका शुनाली खुल्लर श्रॉफ यांनी इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट शेअर करून आलियाला पाठिंबा दिला होता. शुनालीने ट्रोल…

Read More

सरकार-देवाने काम केले असते तर देश बदलला असता:व्यक्ती-समाज जागृत झाल्यास देश बदलता येईल, नितीन गडकरींचे विधान

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात रोखठोक भूमिका मांडली. “सरकार आणि देवाने काम केले असते तर देश कधीचा बदलला असता,” असे ते म्हणाले. लोकांचा सरकार आणि देव या दोघांवर खूप विश्वास असतो, पण या दोघांनाही बाजूला ठेवून व्यक्ती आणि समाजाने जागृत होऊन काम केल्यास देशाला बदलता येईल, असे आवाहन त्यांनी…

Read More

परकीय गुंतवणुकीचा ओघ आटला:देशात आर्थिक आणीबाणी सदृश स्थिती, काँग्रेस प्रवक्ते तिवारींची केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते, जागतिक युद्धजन्य परिस्थितीसोबतच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. यामुळे देशात ‘आर्थिक आणीबाणी’ सदृश गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिवारी यांनी म्हटले की, देशाचे अस्थिर परराष्ट्र धोरण, देशांतर्गत अशांतता, बिघडलेला सामाजिक सलोखा आणि…

Read More

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश:भाजप वैद्यकीय आघाडीच्या पुढाकाराने मोठी कारवाई

नागपुरात ‘सलमान भाई हेअर ट्रीटमेंट’ या नावाने ‘१००% केस उगवण्याचे आयुर्वेदिक उपचार’ देण्याचा दावा करणाऱ्या एका बेकायदेशीर शिबिराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी, नागपूर महानगरच्या पुढाकाराने ही धडक कारवाई करण्यात आली. या शिबिरामुळे नागरिकांची संभाव्य आर्थिक फसवणूक आणि आरोग्याचा धोका टळला आहे. सोशल मीडियावर ‘सलमान भाई हेअर ट्रिटमेंट’ या नावाने मोठ्या…

Read More

पुणे जीसीसी हब बनणार:पुढील 4-5 वर्षांत शहर अत्याधुनिक ओळख निर्माण करेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

पुणे शहराची जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) म्हणून ओळख निर्माण होत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारल्या जात आहेत. पुढील चार ते पाच वर्षांत पुणे एक अत्याधुनिक शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते महंमदवाडी येथे समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याच्या टाक्यांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुंढवा…

Read More

दुभाजकाला धडकून बैतुल येथील दुचाकीस्वार ठार:नातेवाईकांकडून परतताना काळाचा घाला, मोर्शीतील तहसील कार्यालयाजवळील घटना

मोर्शी येथे झालेल्या एका भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटरसायकलस्वाराची धडक रस्ता दुभाजकाला लागल्याने हा अपघात घडला. बाजीराव कुमरे (वय ३२, राहणार बैतुल) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवार, १७ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयासमोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजीराव कुमरे हे मोर्शीजवळील दुर्गवाडा येथे…

Read More

'एल निनो'मुळे अमरावती जिल्हा परिषदेचा जलसंधारणावर भर:पालकमंत्री, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कामांचे नियोजन

अमरावती जिल्ह्यात ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. शनिवारी जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत जलसंधारणाच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे,…

Read More

पर्वणी सोनोनेचा राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक:नागपूर येथील 29 व्या ‘नृत्यसंस्कृती’ स्पर्धेत अमरावतीची मान उंचावली

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या ‘नृत्यसंस्कृती’ राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत अमरावतीची पर्वणी शैलेश सोनोने हिने ज्युनिअर गटातील ‘सेमीक्लासिकल’ नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघातर्फे आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेत पर्वणीने शहराची मान उंचावली. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या गुणवंत स्पर्धकांमुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरली होती. अशा कठीण स्पर्धेत पर्वणीने आपल्या…

Read More