Headlines

Bacchu Kaddu Joins Shiv Sena; Vows to Fight for Farmers & Disabled



‘प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रसंत तुकडोजी

.

शिवसेना प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे स्मरण केले. ते म्हणाले की, “तुकडोजी महाराजांनी आपली ‘ग्रामगीता’ शेतकऱ्यांना अर्पण केली होती. आज त्यांच्याच जयंतीदिनी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत. माझी राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि आता पुढील कार्यही याच पक्षात राहून अधिक प्रभावीपणे करेन.”

एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीवर मोहोर

केवळ आमदारकीच्या पदासाठी नाही, तर मुद्द्यांची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. ते मुख्यमंत्री असताना रात्री २ वाजता सुद्धा वर्षा बंगल्याची दारे उघडी होती. देशातील ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचे काम केले. कर्जमाफीत घेतलेला पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. म्हणून केवळ पद नाही, तर विचार जुळणे महत्त्वाचे असते. विचारासोबत कर्तृत्व महत्त्वाचे असते. त्या दोन्ही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांत पाहतो. ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादीत राहणार नाही, तर आम्ही जे मुद्दे दिलेत, दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे असतील, हमीभावाची लढाई असेल. आमच्या विधवा भगिनी, कामगारांची लढाई आणि युवकांसाठी वेगळे धोरण, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे.

‘प्रहार’ सामाजिक कार्यासाठी, राजकारण शिवसेनेचे

प्रहार ही एक सामाजिक संघटना म्हणून पावले टाकेल, पण राजकारण मात्र शिवसेनेचे मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू. छत्रपती शिवरायांनी जो विचार ठेवला होता, हे राज्य रयतेचे आहे. ते रयतेचे राज्य पुन्हा निर्माण व्हावे आणि त्या सर्वोच्च गादीवर आम्हाला पुन्हा शिंदे साहेब दिसावेत यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. फक्त आमदारकीसाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. आमचे मुद्दे मोठ्या पक्षाच्या हाती जावे आणि हा अजेंडा आम्ही भगवा झेंडा राबवणार आहोत. जो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत आहोत, आता झेंडा बदलला असला, तरी अजेंडा कायम आहे. तोच अजेंडा घेऊन पुढे जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

हे ही वाचा…

बच्चू कडू शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेणार:म्हणाले- ‘प्रहार’ कायम राहणार; रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी तितकाच दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी धावणार

शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहोत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना जाहीर केली होती. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.