Headlines

महाराष्ट्रात पावसाची उघडीप:नाशिक-जळगावसह पुण्याच्या घाटमाथ्यावर आज यलो अलर्ट

महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. झारखंड परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यालगत समुद्रसपाटीपासून सुमारे 5.8…

Read More

श्रीरामपुरातील अराजकतेला विरोधासाठी सर्वात पुढे राहू:महंत रामगिरीजी महाराज यांनी दिला विश्वास‎

श्रीरामपूर शहरात काही काळापासून अराजकता सुरू झालेली आहे. कोणी जर धर्माच्या नावाखाली अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी सर्वात पुढे रामगिरी महाराज असेल, असा विश्वास महंत रामगिरीजी महाराज यांनी श्रीरामपूरवासियांना दिला. सरला बेट येथील सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थानाचे मठाधिपती गुरूवर्य रामगिरीजी महाराज यांनी योगीराज सद्गुरू श्री. गंगागिरी महाराज १७९ वा अखंड…

Read More

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी, प्रशासनास दिले निवेदन‎

येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (पूर्वीचे डफरीन हॉस्पीटल) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) लागलेल्या आगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अमरावती महानगर कौन्सिलने य . २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवजात शिशु कक्षामध्ये अचानक आग लागून तीन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बालके…

Read More

येत्या आठ दिवसांत पाहणी करण्याचे निर्देश‎:मोठ्या आस्थापनांच्या अग्निशमन यंत्रणेबाबत व्यापक मोहिम घेणार- जिल्हाधिकारी

जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मोठ्या आस्थापनांमध्ये सुसज्जित अग्निशमन यंत्रणा असावी, यासाठी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या गर्दीच्या ठिकाणी आगीचा प्रकार घडू नये, यासाठी व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार २५ रोजी फायर ऑडीट आणि फायर सेफ्टी ऑडीट, इतर उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात…

Read More

श्री ‘नागनाथ महाराज की जय’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला:श्रावणानिमित्त मोहोळमधील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी‎

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी मोहोळ येथील श्री नागनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. श्रावण सोमवारनिमित्त श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या . श्रावण महिन्यात श्री नागनाथ महाराजांच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने मोहोळ शहरासह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दाखल झाले होते. दिवसभर…

Read More

MPSC Drug Inspector Exam Cancelled; Rohit Pawar Demands Resignation

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच व . रोहित पवार म्हणाले की, पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यानिशी समोर आणला होता आणि…

Read More

दोन दशके वाट पाहिली; 95 किमी चालत सरकारला विचारणार जाब:अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्यासाठी संजय काळेंचा सावळीविहीर ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास‎

अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंगळवारी सावळीविहीर फाटा येथून अनोख्या पायी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे ९० ते ९५ किलोमीटरचा प्रवास करून ते अहिल्यानगर ज . पहिल्या दिवशी सावळीविहीर फाटा ते राहाता असा सुमारे १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून काळे छत्रपती शिवाजी चौकात पोहोचले. यावेळी…

Read More

शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार- मुख्यमंत्री फडणवीस:कर्जमाफीची रक्कम साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा‎

श्रीरामपूर शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ. पुढील काळात वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

Read More

विद्यार्थिनींनी जवानांसाठी विणला मायेचा धागा‎:प्रत्येक राखीत विद्यार्थ्यांनी गुंफला जवानांसाठी प्रेम, शुभेच्छा आणि देशसेवेबद्दलचा आदर‎

देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांप्रती आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या घरातील भाऊ-बहिणीच्या नात्याप्रमाणेच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशीही आपले भावनिक नाते…

Read More

सप्तशृंगीनगरात बिबट्याची दहशत‎:वणी परिसरातील घटनास्थळी पावलांचे ठसे, वन विभागाकडून पाहणी

शहरातील सप्तशृंगीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली असलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच कुत्र्याशी झटापट झाल्याचे संकेत आढळून आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सप्तशृंगीनगर परिसरातील कुत्रे अचानक जोरजोरात भुंकत होते….

Read More