Headlines

दोन दशके वाट पाहिली; 95 किमी चालत सरकारला विचारणार जाब:अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्यासाठी संजय काळेंचा सावळीविहीर ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय पायी प्रवास‎

अहिल्यानगर-कोपरगाव रस्त्याच्या रखडलेल्या कामाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मंगळवारी सावळीविहीर फाटा येथून अनोख्या पायी आंदोलनास सुरुवात केली. सुमारे ९० ते ९५ किलोमीटरचा प्रवास करून ते अहिल्यानगर ज . पहिल्या दिवशी सावळीविहीर फाटा ते राहाता असा सुमारे १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून काळे छत्रपती शिवाजी चौकात पोहोचले. यावेळी…

Read More

शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज देणार- मुख्यमंत्री फडणवीस:कर्जमाफीची रक्कम साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा‎

श्रीरामपूर शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पूर्ण करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांत आतापर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा केली. ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज मिळत आहे. टप्प्याटप्प्याने १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ. पुढील काळात वर्षभर १२ तास मोफत वीज देण्याचा निर्धारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त…

Read More

विद्यार्थिनींनी जवानांसाठी विणला मायेचा धागा‎:प्रत्येक राखीत विद्यार्थ्यांनी गुंफला जवानांसाठी प्रेम, शुभेच्छा आणि देशसेवेबद्दलचा आदर‎

देवगाव येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीतही अहोरात्र देशसेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एक राखी जवानांसाठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जवानांप्रती आपुलकी आणि आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तयार केल्या. आपल्या घरातील भाऊ-बहिणीच्या नात्याप्रमाणेच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशीही आपले भावनिक नाते…

Read More

सप्तशृंगीनगरात बिबट्याची दहशत‎:वणी परिसरातील घटनास्थळी पावलांचे ठसे, वन विभागाकडून पाहणी

शहरातील सप्तशृंगीनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भोई हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या कारखाली असलेल्या कुत्र्याला बिबट्याने ओढून नेल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे तसेच कुत्र्याशी झटापट झाल्याचे संकेत आढळून आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सप्तशृंगीनगर परिसरातील कुत्रे अचानक जोरजोरात भुंकत होते….

Read More

वाळूने भरलेल्या हायवाने दोन शालेय विद्यार्थिनींना चिरडले:एक जागीच ठार, गंभीर जखमी नंदिनीवर‎ संभाजीनगरला उपचार‎

तालुक्यातील विटावा-एकलहेरा रस्त्यावर वाळूने भरलेल्या विनाक्रमांकाच्या हायवा ट्रकने शाळेतून पायी घरी जाणाऱ्या दोन बहिणींना चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात आठवर्षीय चिमुकली जागीच ठार झाली, तर तिची बहीण गंभीर जखमी झाली आहे. आरुषी कृष्णा तिवारी (८) असे मृत तर नंदिनी तिवारी (१६) असे गंभीर जखमी मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरुषी…

Read More

परसोडा येथे वारकऱ्यांची अवतरली पंढरी; पन्नास हजारांवर भाविक:मधुसूदन महाराज मोगल यांचे काल्याचे कीर्तन उत्साहात‎

वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील संत बहिणाबाई महाराज अखंड हरिनाम सप्ताहाची मधुसूदन महाराज मोगल यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. दहा दिवसांपासून सुरू असलेल्या परसोडा येथील संत बहिणाबाई अखंड हरिनाम सप्ताहात ४० एकर जागेवर भव्यदिव्य कीर्तन मंडप व्यवस्था, दर्शन मंडप, पंगतीची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था उभारण्यात आली होती. या सोहळ्यासाठी ५० हजार भाविकांनी उपस्थिती लागली होती. आज परसोडा…

Read More

सत्ता मिळाल्यावर 8 महिन्यांनी गुंठेवारीची दंडमाफी:भाजपचे 57 नगरसेवक, महापौर, सभापतीही; पण निर्णयच होत नव्हते

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुंठेवारी नियमितीकरणातील जाचक दंडावरून रंगलेल्या जोरदार चर्चेनंतर अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. शहरात महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन 8 महिने उलटल्यानंतर, महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये गुंठेवारीसाठी लागू करण्यात आलेला ॲन्सलरी व मार्जिन साइडचा 10-10 टक्के असा एकूण दंड पूर्णपणे माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला. या…

Read More

आमदारांनो, स्वतःच्या निधीतून कामे करा, जि.प.च्या पैशांतून नको:डीपीसीच्या 40 टक्के कपातीवरून सर्वसाधारण सभेत सदस्यांनी हक्काचा निधी मिळण्यासाठी केला गदारोळ

जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) मिळणाऱ्या हक्काच्या निधीवर आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांकडून तब्बल ४० टक्के डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत मंगळवारी (२५ ऑगस्ट) झालेल्या जि. प. च्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्यांनी जोर . जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. या वेळी मुख्य कार्यकारी…

Read More

मंत्रालयात ‘उसनवारी’ संस्कृतीला चाप; अनधिकृत नेमणुका केल्या रद्द:गैरव्यवहाराला चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणणे, गती वाढवणे आणि नियमांची पायमल्ली थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. विविध मंत्री कार्यालये आणि मंत्रालयीन विभागांमध्ये कोणतीही अधिकृत प्रक्रिया न राबवता, केवळ “उसनवारी’ (प्रतिनियुक्ती सदृश) किंवा “मौखिक आदेशा’च्या आधारे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्य सचिव राजेश…

Read More

खोट्या माहितीने नायब तहसीलदार बनले 7 जण:23.65 लाखांची वसुली करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

खोट्या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार पदापर्यंत पोहोचलेल्या सात अधिकाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी वसुलीची नोटीस बजावली आहे. या सात नायब तहसीलदारांकडून एकूण २३ लाख ६५ हजार ७५६ रुपये सरकारी तिजोरीत जमा केले जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या रकमेच्या तातडीने वसुलीचे आदेश दिले आहेत. या कारवाईत लक्ष्मीकांत तिवारी, अविनाश हाडोळे, संजय मुरतकर, संजय आवारे, संदीप टांक, प्रशांत…

Read More