Headlines

अवैध सावकारीवर कारवाई, परतवाडा-धोतरखेड्यात 4 पथकांचे छापे:कोरे स्टॅम्प, धनादेश आणि खरेदीखतांसह 69 संशयास्पद दस्तऐवज जप्त

परतवाडा शहर आणि धोतरखेडा परिसरात सर्रास सुरू असलेल्या अवैध सावकारीच्या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी धडक कारवाई केली. येथील जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार यांच्या आदेशानुसार गठित चार विशेष पथकांनी पोलीस ताफ्यासह वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकल्या. या कारवाईत कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश, इसारचिठ्ठी आणि खरेदीखतांसह एकूण ६९ संशयास्पद दस्तऐवज…

Read More

सीईओंचा जिल्हाभर पाहणी दौरा:शाळा, अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणा, शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

जिल्हा परिषदेच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमधील मूलभूत सुधारणांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आग्रही झाले आहेत. त्यांनी जिल्हाभर पाहणी दौरा सुरू केला असून, आतापर्यंत सहा तालुक्यांचा दौरा पूर्ण केला आहे. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सीईओनी चांदूरबाजार, अमरावती आणि भातकुली तालुक्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांची पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नांदगाव खंडेश्वर आणि चिखलदरा तालुक्यांचा…

Read More

बुलडाण्यात महिलेची रस्त्यावरच प्रसूती:ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मदतीस नकार दिल्याचा आरोप, खासगी नर्सच्या मदतीने टळला अनर्थ

बुलडाणा‎ जिल्ह्यातील मेहकर येथे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे विदारक सत्य समोर आणणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावर एका गर्भवती महिलेची चक्क रस्त्यावरच प्रसूती झाली. धक्कादायक बाब म्हणजे, महिला रस्त्यावर वेदनांनी तडफडत असताना तिला मदत करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील ‘स्टाफ नर्स’ने (परिचारिका) येण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप…

Read More

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हालचालींना वेग:उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रसाद लाड, शंभूराज देसाई उपस्थित

मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक आज सुरू झाली आहे. या बैठकीला राधाकृष्ण विखे-पाटील, प्रसाद लाड आणि शंभूराज देसाई यांची उपस्थिती असून, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा सुरू आहे. विशेषतः ५८ लाख मराठा-कुणबी नोंदी, त्या आधारे जात प्रमाणपत्रांचे वाटप, प्रलंबित प्रमाणपत्रे, प्रशासनाकडून होणारी दिरंगाई आणि सातारा गॅझेट या मुद्द्यांवर…

Read More

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण:तिघांवर गुन्हा दाखल, हिंगोलीतील घटना

हिंगोली शहरातील अकोला रोड भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास तिघांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. २५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी अतुल बोरकर हे सोमवारी ता. २४ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी जात…

Read More

पुणे महापालिकेत महायुतीचे ‘लेटर वॉर’ तीव्र:भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना लिहिले पत्र, राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आक्षेप

पुणे महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. महापालिकेतील विविध मुद्द्यांवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सुरू असलेला संघर्ष आता थेट पत्रव्यवहारापर्यंत पोहोचला आहे. सभागृह नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे भूमिका मांडल्यानंतर आता भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे….

Read More

नागपुरात 'जेन झी'वर राजकीय पक्षांचे लक्ष:अमित ठाकरे, राहुल गांधींसह नेते साधणार संवाद

नागपूरमध्ये आगामी राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आता ‘जेन झी’ अर्थात तरुण पिढी आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच विद्यार्थी संघटनांनी नवमतदारांवर आणि महाविद्यालयीन तरुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. इतर नेत्यांच्या दौऱ्यांची चर्चा सुरू असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांशी थेट संवाद साधून या राजकीय शर्यतीत आघाडी घेतली आहे. कम्युनिस्ट पार्टीची विद्यार्थी…

Read More

साखरेवरून राजकारण तापले:राजू शेट्टींच्या आरोपांवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा पलटवार; साखर गायब झाली किंवा घोटाळा झाला म्हणणे वस्तुस्थितीला धरून नाही!

साखरेच्या वाढलेल्या दराचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडली आहे. साखरेचे दर वाढले असताना त्याचा लाभ केवळ साखर कारखानदारांपुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 5 लाख 36 हजार शेतकऱ्यांना 5 हजार 86…

Read More

जुन्नर पीडितेच्या कुटुंबीयांना १० लाखांची आर्थिक मदत मंजूर:गुन्हा घडल्यानंतर ७ दिवसांत 'मनोधैर्य योजने'अंतर्गत निर्णय

जुन्नर तालुक्यातील लैंगिक अत्याचार आणि खुनाच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांना ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गुन्हा घडल्यानंतर अवघ्या सात दिवसांत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे 18 ऑगस्ट रोजी साडेनऊ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी…

Read More

पुणे येथे नाट्यछटा महोत्सव सुरू:७५ कलाकार सहभागी, लेखन-सादरीकरण-परीक्षण-परिसंवाद होणार

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पुण्यात ‘नाट्यछटा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2026 या कालावधीत ज्योत्स्ना भोळे सभागृह,महाराष्ट्र कल्चरल सेंटर,टिळक रोड येथे हा महोत्सव दररोज सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत होणार आहे. या महोत्सवात शिशु कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत एकूण 75 कलाकार सहभागी होणार असून,रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नाट्यछटा हा…

Read More