लोहाऱ्यात नवे ‘नमो’ उद्यान सजले; जुन्या बालोद्यानांची मात्र दुरवस्था:लोहाऱ्यात कोटीच्या निधीतून उद्यान अंतिम टप्प्यात; काही दिवसांत लोकार्पण
. लोहारा शहरालगत पाटोदा रोडशेजारी नगरपंचायतीकडून नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जवळपास एक कोटी रुपये खर्चून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. उद्यानाचे काम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत त्याचे लोकार्पण होऊन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी व्यायाम व चालण्याची सुविधा, योगा शेड, आकर्षक पथदिवे, संरक्षक भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याचे…