Headlines

गोंदिया हादरले:अंगणात खेळणाऱ्या 2 वर्षांच्या चिमुकलीवर अचानक कोसळली शेजाऱ्यांची भिंत, जागीच मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर अचानक शेजारील पडक्या घराची भिंत कोसळली. या भीषण दुर्घटनेत भिंतीखाली दबून या बालिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतीक्षा मुकेश राऊत असे या मृत बालिकेचे नाव आहे. सोमवारी (दुपारी…

Read More

'फार्माईश' ॲप स्थानिक औषध विक्रेते, ग्राहकांना जोडणार:डॉ. दीपमाला पाटील यांनी विकसित केले व्यासपीठ; औषध खरेदी प्रक्रिया सुलभ होणार

पुण्यातील डॉ. दीपमाला पाटील (पीएचडी इन फार्मसी) यांनी ‘फार्माईश’ नावाचे एक तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठ विकसित केले आहे. हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या परिसरातील परवानाधारक औषध विक्रेत्यांशी जोडणार आहे. प्रिस्क्रिप्शनवर औषधे मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच स्थानिक औषध विक्रेत्यांची आरोग्यसेवेतील भूमिका अधिक सक्षम करणे हा यामागील उद्देश आहे, अशी घोषणा डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमाचा…

Read More

पुण्यात 361 कृत्रिम अवयव, कॅलिपर्सचे मोफत वाटप:नारायण सेवा संस्थानने 328 दिव्यांग व्यक्तींना दिली स्वावलंबनाची नवी उमेद

पुण्यात जपानी आणि जर्मन तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या 3 डी-प्रिंटेड नारायण मॉड्युलर कृत्रिम अवयवांच्या फिटमेंटसाठी एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नारायण सेवा संस्थान, उदयपूर, टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस आणि न्यूमन अँड एस्सार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने टिंगरे नगर येथील तिरुपती मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडले. या शिबिरात ३२८ दिव्यांग व्यक्तींना एकूण ३६१ कृत्रिम अवयव…

Read More

डॉ. स्वाती दैठणकर यांचे 'नर्तन कीर्तनम्' सादर:वैष्णव तत्त्वज्ञान भरतनाट्यममधून उलगडले; रसिकांची दाद

पुण्यात डॉ. स्वाती दैठणकर यांच्या ‘नर्तन कीर्तनम्’ या नृत्यप्रस्तुतीला रसिकांनी भरभरून दाद दिली. कर्वे रस्त्यावरील बालशिक्षण मंदिर सभागृहात रविवारी हे सादरीकरण झाले. या कार्यक्रमातून वैष्णव परंपरेतील संतकवी श्री रूप गोस्वामी यांच्या भक्तीरसपूर्ण आणि तत्त्वज्ञानपर रचना भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, नृत्यगुरू आणि नृत्यसंरचनाकार डॉ. स्वाती दैठणकर यांनी आपल्या शिष्यांसह ही प्रस्तुती…

Read More

‘टिंबकटू कलेक्टिव्ह’, ‘कॉज टू कनेक्ट’ला किर्लोस्कर वसुंधरा सन्मान:19 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, पुणे येथे पुरस्कार प्रदान

पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘द टिंबकटू कलेक्टिव्ह’ संस्थेला ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ प्रदान करण्यात आला. तसेच, स्थानिक पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘कॉज टू कनेक्ट’ संस्थेला ‘किर्लोस्कर वसुंधरा मित्र’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हे पुरस्कार पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित १९ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपप्रसंगी प्रदान करण्यात आले. या महोत्सवाला पर्यावरणतज्ज्ञ, वन्यजीव…

Read More

आता जास्त काम करू शकत नाही:"नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे”; नितीन गडकरींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामातील सहभाग कमी झाल्याचे सांगत “आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीच्या हाती काम दिलं पाहिजे,” असे विधान केले आहे. नागपुरातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. गडकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली…

Read More

'बामू'ला पहिल्यांदाच 'आविष्कार'चे यजमानपद:संभाजीनगरातील महोत्सवात 26 युनिव्हर्सिटीतील दीड हजार विद्यार्थी लावणार हजेरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाराष्ट्र राजभवनाच्या (लोकभवन) वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवा’चे यजमानपद पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळाले आहे. गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी या विद्यापीठाला प्रथमच मिळाली आहे. येत्या 16 ते 19 जानेवारी 2027 दरम्यान…

Read More

पुण्यात कौटुंबिक वादातून फायरिंग:पती जखमी, फरासखाना पोलिसांकडून तपास सुरू

फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून फायरिंग झाल्याची घटना समोर आली आहे. अभिजीत शंकर शिंगोटे (वय 30) याचा पत्नीसमवेत कौटुंबिक वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत शिंगोटे आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली…

Read More

Renowned Marathi Grammar Expert Prof. Yasmin Sheikh Passes Away in Pune

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक, लेखिका आणि शिक्षिका प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (24 ऑगस्ट) पुण्यात निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधना . जन्माने ज्यू, मात्र मराठी भाषेशी आयुष्यभराचे नाते यास्मिन शेख यांचा जन्म 21 जून 1925 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव जेरुषा रुबेन…

Read More

औंढा नागनाथमध्ये 8तासात 40 हजार भाविकांनी घेतले नागनाथाचे दर्शन:गर्दीमुळे अभिषेक पुजा अन् विशेष पास दर्शन बंद

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी ता. 24 रोजी आठ तासात तब्बल 40 हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. हर हर महादेव, बम बम भोलेच्या गजराने नागनाथ मंदिर परिसर दणाणून गेला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील भावकांचा ओघ कायम आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे….

Read More