Headlines

चारठा येथे विकासकामांचे लोकार्पण:ग्रामपंचायत इमारतीस 20 लाखांचा निधी, शिवसेना शाखेचे उद्घाटन‎

तालुक्यातील चारठा येथे शनिवारी शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन पठाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या नेतृत्वाला मोठे बळ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कार्यक्रमास खासदार संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी…

Read More

व्यसनमुक्ती हाच जीवनाचा श्रेष्ठ धर्म- रामगिरीजी महाराज:धनगरवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहात 2 लाख 75 हजार भाविकांनी घेतली सामूहिक शपथ‎

श्रीक्षेत्र गोदावरी सरला बेटाचे योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी सुरू केलेल्या आणि वारकरी संप्रदायाचा महाकुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहात रविवारी धनगरवाडी येथे भक्तीबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा अनोखा जागर झाला. महंत रामगिरीजी महाराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल २ लाख ७५ हजार भाविकांनी दोन्ही हात उंचावून व्यसनांपासून दूर राहण्याचा, मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा आणि…

Read More

मन:शांतीसाठी प्रत्येकाने स्वीकारावा परमार्थ मार्ग:मानुर येथे सप्ताहात राजराजेश्वरी दीदींचे निरुपण‎

परमेश्वराच्या दर्शनाने मनाची चंचलता संपून ते चरणी स्थिरावते. जगातील सुख-दुःख, भूक-तहान यांचा विसर पडतो आणि अहंकार नष्ट होतो. त्यामुळे नागरिकांनी संसारासोबत परमार्थाची जोड द्यावी, असा संदेश राजराजेश्वरी दीदी बिलमाळ यांनी कीर्तनातून दिला. तालुक्यातील मानूर येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन सप्ताहात राजराजेश्वरी दीदी यांनी पाचवे पुष्प गुंफले. आजची सेवा लता पवार, कडू पवार यांच्या वतीने…

Read More

श्री संत शंकरस्वामी महाराज सप्ताहाच्या सांगतेला 101 क्विंटल साखरेचा प्रसाद:खंडाळा येथे 10 मिनिटांत 1 लाख भाविकांना वाटपाचे नियोजन‎

श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान शिऊर फडाचा २८१ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह यंदा वैजापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडाळा येथे भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. १७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता मंगळवारी होणार आहे. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण खंडाळा परिसराला…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:ऑगस्ट महिन्यात 55% पावसाची तूट; 6.37 लाख हेक्टरवरील पिके संकटात

जिल्ह्यात सरकारी कागदावर पावसाची स्थिती समाधानकारक दिसत असली तरी जूनपासून १८ ऑगस्टपर्यंत अपेक्षित ३६६.७० मिमीच्या तुलनेत प्रत्यक्ष ३८३.७० मिमी म्हणजे १०४.६४ टक्के पाऊस झाला आहे. मात्र या आकड्याच्या पोटात ऑगस्टची मोठी तूट दडली आहे. ऑगस्टची सरासरी ८९.३० मिमी असताना आतापर्यंत केवळ ४०.५० मिमी म्हणजे ४५.४० टक्के पाऊस झाला. अर्थात चालू महिन्यात पावसाची तूट तब्बल ५४.६०…

Read More

कन्नड घाटात थरार:स्टिअरिंगचा रॉड तुटून बस दरीच्या दिशेने; चालकाच्या सतर्कतेने 50 जीव वाचले, 4 प्रवासी जखमी, छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे निघाली होती बस

छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या बसचा कन्नड घाटात स्टिअरिंगचा रॉड तुटून पुढील चाक निखळल्याने दरीच्या दिशेने घसरली. बसमध्ये ५० प्रवासी असल्याने क्षणातच प्रवाशांच्या काळजात धडकी भरली. चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक लावून बस दरीत कोसळण्यापासून रोखल . बस सुरतकडे जाण्यासाठी निघाली. वेरुळजवळ वाहतुकीची कोंडी झाल्याने तेथे बसला एक तास विलंब झाला. दुपारी एक वाजेच्या सुमारास बस कन्नड…

Read More

जरांगेंचा इशारा, मराठे मुंबई गाठणार; हालचालींना वेग:मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असून या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला आहे. येत्या २९ ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचे पुन्हा उपोषण सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी करून संभाव्य आंदोलनाची पूर्वतयारी सुरू केली आहे. मागील आंदोलनात पावसामुळे…

Read More

पुण्याच्या बँकेतून 200 कोटी विदेशात; आयटीची नजर:2143 कोटींचा उदगीर, लातुरातील महाघोटाळा

उदगीर (लातूर) सीएने बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे केलेल्या २१४३ कोटींच्या परकीय चलन घोटाळ्यात आता बँकिंग क्षेत्रातील मोठे ‘सिंडिकेट’ उघडकीस येण्याची शक्यता आहे. बनावट संस्थांच्या नावे हजारो कोटी रुपये परदेशात वळवण्याचे हे रॅकेट बँकांच्या ‘अर्थपूर्ण’ सहभागाशिवाय शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या सिंडिकेटमधील सीए श्याम कलानी रविवारी उदगीर पोलिसांना शरण आला आहे. सूत्रांनुसार बँकिंग व्यवहारांना मुभा…

Read More

फडणवीसांनी बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये:काँग्रेसचे गोपाळ तिवारी यांचा मुख्यमंत्रीपदाच्या गरिमेचा सल्ला

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. मोदी-शहा यांना खूश करण्यासाठी काँग्रेसवर सातत्याने तथ्यहीन टीका करण्याच्या नादात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची गरिमा राखावी आणि बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करू नये, असे तिवारी म्हणाले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही फडणवीस दिशाभूल करणारी विधाने करत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसभेत मंजूर…

Read More

मोर्शीत विहिरीत आढळले वृद्ध महिलेचे प्रेत:काटपूर गावात खळबळ, पोलीस तपास सुरू

मोर्शी तालुक्यातील काटपूर (ममदापूर) गावात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी, २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मृत महिलेचे नाव सुमन किसनराव यावले असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यावले यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मृतदेह प्रवीण मधुकर यावले यांच्या शेतातील विहिरीत…

Read More