मोर्शीत विहिरीत आढळले वृद्ध महिलेचे प्रेत:काटपूर गावात खळबळ, पोलीस तपास सुरू
मोर्शी तालुक्यातील काटपूर (ममदापूर) गावात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी, २३ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मृत महिलेचे नाव सुमन किसनराव यावले असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमन यावले यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मृतदेह प्रवीण मधुकर यावले यांच्या शेतातील विहिरीत…