112 वर सासूच्या खुनाची खोटी माहिती देणे महागात:जावयाविरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे डायल 112 क्रमांकावर संपर्क साधून सासूचा खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या पियूष वाघमारे याच्याविरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 26) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुंदा पोलिस ठाण्यात डायल 112 कक्ष स्थापन करण्यात आला असून, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी या कक्षात स्वतंत्र पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात…