पुण्यात 455 किलो अंमली पदार्थ नष्ट, 4.11 कोटींचा मुद्देमाल:'ड्रग्जमुक्त भारत' मोहिमेअंतर्गत 123 गुन्ह्यांतील मुद्देमालाची विल्हेवाट
पुणे शहर पोलिसांनी ‘ड्रग्जमुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहरातील विविध २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून जप्त करण्यात आलेले तब्बल ४५५ किलो ८४५ ग्रॅम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत ४ कोटी ११ लाख ९१ हजार ७६५ रुपये आहे. रांजणगाव एमआयडीसी येथील एका कारखान्यात ही कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली. ‘ड्रग डिस्पोजल कमिटी’च्या परवानगीने…