महागड्या सांधेबदल शस्त्रक्रियांसाठी मिळणार सरकारी मदत:कॅन्सर तपासणी शिबिर, सांधेबदल शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत मिळवून देणार- चिवटे
अहिल्यानगर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असलेला रूग्णसेवेचा महायज्ञ खरोखरच कौतुकास्पद आहे. अल्प दरात आणि वेळप्रसंगी मोफत मिळणारे दर्जेदार उपचार सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. येथील सांधेबदल (हिप व गुडघे) शस्त्रक्रियांसाठी संतोष बोथरा यांच्या आग्रहानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष मंगेश चिवटे यांनी दिली….