Headlines

महाराष्ट्रात लोकप्रिय कोण? फडणवीस की शिंदे?:CM पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंती असल्याच्या दाव्याची भाजपकडून अक्षरशः खिल्ली

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात पसंतीचा उमेदवार कोण? असा सर्व्हे केला तर एकनाथ शिंदे यांच्याच नावाला सर्वाधिक पसंती मिळेल, या आमदार बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेत राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजपने बच्चू कडू यांच्या या दाव्याची अक्षरशः खिल्ली उडवली आहे. आता नोकरी मिळाली, तर बच्चू कडूंना आपल्या मालकाचे गुणगान करावेच लागेल. पण महाराष्ट्रात देवेंद्र…

Read More

Amit Thackerays Anger on NEET Paper Leak; Asks Govt How Low Will It Go?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी नीट पेपरफुटीवर मोठा संताप व्यक्त केला आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपले आयुष्य संपवले आहे. ही आत्महत्या नाही तर या व्यवस्थेने केलेला अधिकृत खून आहे, असे त्यांन . देशात गत 3 मे रोजी वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली नीट परीक्षा झाली होती. पण…

Read More

लाच प्रकरणात ग्रामसेवकाला जामीन मंजूर:सवना येथील घरकुलासाठी घेतली होती अडीच हजारांची लाच

सेनगाव तालुक्यातील सवना येथे घरकुलाच्या प्रस्तावासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकास हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माडे गाडेकर यांनी शनिवारी ता. १६ जामीन मंजूर केला आहे. सेनगाव तालुक्यातील सवना येथील एका लाभार्थ्याला मंजूर झालेल्या घरकुलाच्या पाहणी अहवालावर स्वाक्षरी करून प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी ग्रामसेवक रामप्रसाद खिल्लारी याने लाभार्थ्याकडे ५ हजाराची मागणी केली…

Read More

अल्पभूधारक शेतकऱ्याची शेतात गळफास घेऊन आत्महत्या:कर्जामुळे उचलले टोकाचे पाऊल, हिंगोलीच्या जयपूरवाडीमधील घटना

हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथील एका अल्पभुधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ता. 17 उघडकीस आली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथील शेतकरी मारोती नामदेव फाळके (44) यांना…

Read More

NCP च्या झिशान सिद्दीकींची आमदारकी धोक्यात?:प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची स्वाक्षरी ठरणार कारण; नुकतीच विधान परिषदेवर झाली निवड

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ने नुकतेच झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर पाठवले. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या स्वाक्षरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. तटकरे सध्या पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही, याबाबतच संभ्रम असल्याने झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे…

Read More

उल्हासनगरात महिलेची चपलांचा हार घालून धिंड:रोहित पवारांचा संताप; आरोपींवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी परिसरात गत 14 तारखेला मंदिर प्रवेशाच्या कारणावरून एका 50 वर्षीय महिलेली चपलांचा हार धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. समतेच्या ज्योत पेटवणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील, तर हे आपल्या सर्वांचे अपयशच आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी…

Read More

पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर या मुंबईतील…

Read More

शनिअमावास्येला पूजाविधीनंतर वाद, मित्र-मैत्रिणीची भोंदू बाबाकडून हत्या:साक्रीत अघोरी थरार; घटनेनंतर काही तासांत भोंदूला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नाशिकचा बोगस ‘डॉक्टर खरात’ आणि सोलापूरचा ‘मनोहर मामा’ यांच्या भोंदुगिरीच्या घटना ताज्या असतानाच, आता धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही अंधश्रद्धेची रक्तरंजित घटना समोर आली आहे. तेथे एका कथित भोंदूबाबाच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या मित्र-मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोंदूबाबाच्या सापडलेल्या रुमालावरून या घटनेचे बिंग फुटले आणि काही तासांतच पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, पूजाविधीनंतर…

Read More

घोडेगाव बाजारात बोकडाला 1 लाख 11 हजारांचा भाव:‘बकरी ईद’च्या पार्श्वभूमीवर सव्वा कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त‎

आगामी २७ तारखेला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, येथील प्रसिद्ध शेळी बाजारात बोकडांची विक्रमी आवक झाली. तर एका देखण्या बोकडाला तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. हा व्यवहार संपूर्ण बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, नाशिक, कल्याण आणि ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी बोकड खरेदी-विक्रीसाठी बाजारात दाखल झाले…

Read More

परिचारिकांचे कामबंद आंदोलन:सेवा विस्कळीत होण्याची भीती, शल्य चिकित्सक, पालकमंत्र्यांची घेतली भेट‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथे एका महिला अधिपरिचारिकेवर (नर्स) झालेल्या अत्याचाराची स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनादरम्यान या परिचारिकांनी आज दिवसभरात पालकमंत्री, जीएमसीचे अधिष्ठाता, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आणि सिटी कोतवालीचे ठाणेदार यांची स्वतंत्ररित्या…

Read More