शासकीय आदेश निघूनही वाळू वाहतूक ठप्प; प्रशासनाचा सावळा गोंधळ कायम:डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा डेपोचे लाखो रुपये भरूनही गाड्या बंदच
प्रतिनिधी | वैजापूर तालुक्यात सध्या टेंडर शिल्लक वाळूचे, पण नजर मात्र गोदावरीच्या नव्या वाळूवर. अशी एकच चर्चा रंगू लागली आहे. तालुक्यातील डागपिंपळगाव आणि बाभुळगावगंगा येथील वाळू डेपोचे टेंडर पूर्ण झाले. ठेकेदारांनी लाखोंची चलने भरली. शासनाचे आदेशही निघाले. वाहतुकीची तारीखही निश्चित झाली. मात्र, एवढी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष वाळू वाहतूक अजूनही सुरू झालेली नाही….