जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस
प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट…