दीड लाख भाविकांनी घेतले चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन:कामिका एकादशीनिमित्त पुणतांबे दुमदुमले; दिंड्या, टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाचा जयघोष
‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे आषाढ वद्य कामिका एकादशीनिमित्त (धाकटी एकादशी) योगीराज संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली. मध्यरात्रीपासून सुरू झालेली दर्शनाच . वार्षिक परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विविध भागांतून, विशेषतः खानदेश, मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांतून वारकरी दिंड्यांसह पुणतांब्यात दाखल झाले होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी…