Headlines

बहुजन समाजाच्या वतीने जरांगे-पाटील यांचा सत्कार‎:‘समाजावर अन्याय झाला तर सहन करणार नाही वाटंबरेत जरांगे-पाटलांची सरकारवर जोरदार टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. समाजात फूट पाडण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुर . सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे रविवारी मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. सभेला उशीर झाला असतानाही मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोला…

Read More

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात:मावळ परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 6 तरुण…

Read More

Blinkit Malad Godown License Suspended; Mumbai Milk Adulteration Exposed

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईत बनावट आणि आरोग्यासाठी घातक अन्नपदार्थांच्या विक्रीवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. अमेझॉनच्या प्रकरणानंतर आता ग्राहकांच्या दारात 10 मिनिटांत किराणा पोहोचवणारी प्रसिद्ध कंपनी ‘ब्लि . ब्लिंकिटच्या गोदामातील धक्कादायक वास्तव 7 ऑगस्ट 2026 रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मालाड येथील ‘ब्लिंक कॉमर्स प्रा. लि.’च्या गोदामावर अचानक धाड टाकली….

Read More

मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल!:गडचिरोलीतील मृत्यूंवरून संजय राऊतांचा संताप, म्हणाले- अमित शहांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल

गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आदिवासींची मुले सर्पदंशाने आणि विंचू चावल्याने मरत आहेत, तर दुसरीकडे हजारो आदिवासी खनिज कंपन्यांच्या गाड्यांखाली चिरडून मरत आहेत. हे सरकार केवळ आदिवासींच्या जीवावर उठले आहे,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी…

Read More

13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:कोकण-घाटमाथ्यांवर यलो अलर्ट, चीनच्या 'डॉल्फिन' चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव

महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत श्रावण महिन्याची सुरुवात होत असून, त्यापूर्वीच राज्यात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांमुळे मध्य भारतात हवेचे जोडक्षेत्र निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसून येत असून, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला…

Read More

हिंगोलीत पहाटे 8 किलो गांजा पकडला:सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, एक जण ताब्यात

हिंगोली शहरातील बसस्थानका समोरील एनटीसी कमानीजवळ शहर पोलिसांच्या पथकाने एका व्यक्तीच्या संशयावरून त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यातून 8 किलो 135 ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. 11 सकाळी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरातील अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस दलाने…

Read More

शेतरस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची; ग्रामस्थांचे पं.स. समोर उपोषण:जिल्हाधिकार, सीईओेंना निवेदन; रोहयोत गैरव्यवहार झाल्याचा आरोप‎

शेत रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असून, रोजगार हमी योजनेच्या कामात घोळ झाल्याचा आरोप करत सोमवारी ग्रामस्थांनी पंचायत समितीपुढे उपोषण केले. याबाबत जिल्हाधिकरी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. . शेतकऱ्यांना शेतात ये- जा करण्यासाठी रस्त्याची समस्या भेडसावते. शेतकऱ्यांना शेतमाल, अवजारे, जनावरे, वाहने शेतात ने- आण करणे सोईचे होत नाही. शेतरस्त्यांवरून वादही होतात. काही…

Read More

संत जनाईच्या दानपेटीतील 2500 रुपयांतून श्रीकृष्ण मंदिराची बांधली भिंत‎:गोपाळपूरमधील श्रीकृष्ण मंदिराची पाठीमागील भिंत 1991 मध्ये देवस्थानाच्या गुरव समाजाकडून बांधल्याचा उल्लेख

गोपाळ कृष्ण मंदिरातील जनाबाई मंदिरात जो पैसा दान केला जातो अर्थात येथील सर्व गुरव हे माणसांकडून (भक्तांकडून) जो पैसा घेतला जातो. त्यातून देवस्थानचा खर्च भागवून जे पैसे उरले त्यातून हे मागील (पिछाडीचे) बांधकाम केले आहे. हे येथील समस्त गुरव यांनी हे केले आहे. या कामासाठी २५०० रुपये खर्च आला. हे काम शके १८३३ ज्येष्ठ शुद्ध…

Read More

कर्मातच ईश्वरसेवा मानत संत सावता महाराजांनी दिला माणुसकीचा संदेश:फिनिक्स फाऊंडेशनच्या शिबिरात उपमहापौर ॲड. जाधव यांचे प्रतिपादन‎

संत सावता महाराजांनी कर्मालाच ईश्वरसेवेचे माध्यम मानून समाजाला माणुसकी, श्रमप्रतिष्ठा आणि भक्तीचा संदेश दिला. याच विचारांचा वारसा पुढे नेत फिनिक्स सोशल फाऊंडेशन हे धर्म, जात-पंथाचा भेद न करता गोरगरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत. . संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनतर्फे नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू…

Read More

दीड लाख भाविकांनी घेतले चांगदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन:कामिका एकादशीनिमित्त पुणतांबे दुमदुमले; दिंड्या, टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाचा जयघोष‎

‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणतांबा येथे आषाढ वद्य कामिका एकादशीनिमित्त (धाकटी एकादशी) योगीराज संत चांगदेव महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली. मध्यरात्रीपासून सुरू झालेली दर्शनाच . वार्षिक परंपरेनुसार महाराष्ट्राच्या विविध भागांतून, विशेषतः खानदेश, मराठवाडा व लगतच्या जिल्ह्यांतून वारकरी दिंड्यांसह पुणतांब्यात दाखल झाले होते. शनिवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी…

Read More