Headlines

डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका, हायकाेर्टाने एफडीएला फटकारले:कॅडिला कंपनीच्या कारवाईवर ताशेरे; कंपनीला नोटीस बजावण्याचे आदेश

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करताना अधिकारांचा वापर तारतम्याने करावा. डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करू नका, अशा तीव्र शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्सच्या २.४५ कोटी रुपयांच्या ॲसिलॉक औषधांच्या साठ्यावर एफडीएने थेट विक्रीबंदी घातली होती. या कारवाईविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या…

Read More

इर्विन रुग्णालयातील अव्यवस्थेविरोधात काँग्रेस आक्रमक:अधिकाऱ्यांना निवेदन, 15 दिवसांत उपाययोजनेची मागणी

अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) मधील आरोग्य सुविधांच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात आज, मंगळवारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांना निवेदन देण्यात आले. रुग्णालयातील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आगामी १५ दिवसांत या समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन…

Read More

महसूलमध्ये 'मानीव दिनांक' पदोन्नती घोटाळा:न्यायालयीन आदेशानंतरही कारवाई नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे 15 ऑगस्टला आंदोलन

विभागीय आयुक्त कार्यालय तसेच तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, भातकुली आणि चांदूर रेल्वे येथील काही कर्मचाऱ्यांनी खोट्या ‘मानीव दिनांका’चा आधार घेऊन पदोन्नती मिळवल्याचा आणि आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतरही महसूल प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे. हा पदोन्नती घोटाळा…

Read More

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परताव्याला वेग:10 ऑगस्टला मिळालेल्या 300 कोटींपैकी 45 कोटी एका दिवसात वितरित

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव्याच्या वितरणाला गती मिळाली आहे. १० ऑगस्ट रोजी महामंडळाला प्राप्त झालेल्या ३०० कोटी रुपयांपैकी ४५ कोटी रुपयांचा व्याज परतावा अवघ्या एका दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने महामंडळाच्या विविध योजनांसाठी ७५० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यापैकी…

Read More

नागपुरात 90 कोटी 25 लाखांचा सायबर घोटाळा उघड:आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, 6 जणांना अटक

नागपूर शहर सायबर पोलिसांनी ९० कोटी २५ लाख रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील महिलांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना दिघोरी नाका परिसरातील पवनपुत्र नगर आणि हुडकेश्वर येथील गजानन नगरमध्ये एका घरातून हे सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याची…

Read More

Maharashtra Clinical Establishments Bill 2026: Demand for Patient Rights

राज्य शासनाने विधिमंडळात मांडलेल्या ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स विधेयक- २०२६’ च्या मसुद्यात सुधारणा करण्याची मागणी जन आरोग्य अभियानाने केली आहे. या विधेयकात ‘राष्ट्रीय रुग्ण हक्क सनदे’तील सर्व २० मूलभूत रुग्णहक्कांचा समावेश करावा आणि रुग्णालयांच्या उप . सध्याचा मसुदा रुग्णहिताला बाधा पोहोचवणारा आणि नोकरशाहीचे वर्चस्व निर्माण करणारा असल्याचा आरोप जन आरोग्य अभियानाने केला आहे. या मसुद्यामुळे बिल न…

Read More

Ram Shinde Honors Captain Mishra

‘एमआयटी एडीटी’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘एखाद्या घरातील पहिला पदवीधर केवळ स्वतःचे भविष्य घडवत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो. त्यामुळे शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आजचा काळ संधीचा काळ आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबो . राम शिंदे…

Read More

औट्रम घाटाचे काम, बायपासला मंजुरी द्या:खासदार संदिपान भुमरेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते आणि वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार संदिपान भुमरे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याची मागणी केली. या भेटीदरम्यान, खासदार संदिपान भुमरे यांनी कन्नड तालुक्यातील औट्रम घाटाचे काम लवकरात…

Read More

पोलीस बॉईज असोसिएशन विरुद्ध अभिजित दिपके!:'कॉकरोच जनता पार्टी'च्या संस्थापकाविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी पोलीस बॉईज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन केले. स्थानिक पातळीवर सध्या ‘पोलीस बॉईज असोसिएशन’ विरुद्ध ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके असा थेट संघर्ष पेटला आहे. या संघर्षाची ठिणगी आज…

Read More

राज्यात सर्व विद्यापीठांसाठी 'एकसमान शैक्षणिक वेळापत्रक':विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कुलगुरूंनी संवाद साधावा- मंत्री चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावेआणि शैक्षणिक वर्ष 2026-27 आणि 2027-28 पासून चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक मंत्रालयात चंद्रकांतदादा पाटील यांच्या…

Read More