आमझरी, खटकली परिसरात पर्यटन संकुल उभारण्याचे आयुक्तांचे निर्देश:होम-स्टे लाभार्थ्यांशी लीना बनसोड यांनी साधला संवाद
चिखलदरा तालुक्यातील आमझरी व खटकली या गावात पर्यटन विकासाच्या मोठ्या संधी असून स्थानिक आदिवासी समाजाला नव्या रोजगाराच्या मार्ग उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथे पर्यटन संकुल उभरण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्त व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी दिले. येथील वनविभागाच्या आमझरी संकुलात आयोजित संवाद बैठकीत त्यांनी हे निर्देश…