Headlines

'एल निनो'च्या संकटामुळे मोठा निर्णय:धरणांमधील पाण्याचे आवर्तन तात्काळ बंद करा, जलसंपदा विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

भारतीय हवामान विभागाने यंदा ‘एल निनो’ परिस्थितीमुळे राज्यात पर्जन्यमानात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत खबरदारीचा उपाय म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध धरणे, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्यासाठी संरक्षित करण्यासाठी सध्या सुरू असलेली पाण्याची सिंचन आवर्तने तात्काळ बंद करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव…

Read More

ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे निधन:पुण्यात श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी वाहिली आदरांजली, राज्याने गमावले निष्ठावंत नेतृत्व

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या निधनानंतर पुण्यात श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. थोपटे यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणातील एक निष्ठावंत, संघर्षशील आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित या श्रद्धांजली सभेला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी मंत्री…

Read More

नकारात्मक परिस्थितीत माणुसकी जपणे महत्त्वाचे – डॉ. सबनीस:मनोहारी मैत्र संघातर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात मत व्यक्त

आजच्या नकारात्मक परिस्थितीत माणुसकी, नीतीमत्ता आणि संस्कृती जपणे हेच सर्वात मोठे ध्येय असायला हवे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. मनोहारी मैत्र संघातर्फे आयोजित ऊर्जाशील अभियंता आणि मातृभूमी सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात…

Read More

ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा:केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा दावा; उद्या मातोश्रीवर तातडीची बैठक

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ची आता उघडपणे चर्चा सुरू झाली असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. “शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडणारे ‘ऑपरेशन टायगर’ आता पूर्णपणे अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील, त्या दिवशी हे ऑपरेशन…

Read More

अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात होऊ शकतो:शिवसेना पदाधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आता कमालीचे राजकीय वळण मिळाले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि माळशिरस तालुक्याचे पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी थेट आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, यावेळी बोलताना…

Read More

भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची CM कडून पाहणी:कुंभमेळ्यापूर्वी 90 टक्के कामे पूर्ण होतील, 150 घरांसाठी नवीन गाव वसवणार – फडणवीस

“बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानच्या परिसर विकास आणि सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचे काम प्रशासनाने अत्यंत वेगाने व उच्च दर्जाचे केले आहे. पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील ९० टक्के कामे पूर्ण केली जातील,” असा ठाम विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. या भव्य विकास आराखड्यामुळे पुढील काळात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या ५ ते…

Read More

दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने मदत:स्मृती सेवाश्रम आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

स्मृती सेवाश्रम, नया अकोला आणि प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिकची रिसॉर्ट, वलगाव येथे दिव्यांग बांधवांना आधार व स्वावलंबनाची दिशा देणारा कार्यक्रम नुकताच पार पडला. या उपक्रमांतर्गत अत्यंत गरजू दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीन, पीठ गिरणी व मिरची कांडप केंद्र यांसारखे रोजगाराभिमुख साहित्य वितरित करुन मदतीचा हात देण्यात आला. याचवेळी कार्यक्रमाचे प्रमुख…

Read More

शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यावर समाजाची प्रगती अवलंबून- डॉ. इंगळे:ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात‎

मानवतेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या चर्मकार समाजातील डॉक्टरांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात उत्साहात पार पडला. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही अपरिहार्य आहेत. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मूलतत्त्वे आहेत. जात, धर्म आणि विषमता यापलीकडे जाऊन सर्वसमावेशक व न्यायाधिष्ठित समाज घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण…

Read More

सोनसाखळी चोरावर पोलिसांची फिल्मी स्टाइल झडप, व्हिडिओ:'क्राइम पेट्रोल' पाहून बनला चेन स्नॅचर; 150-200 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी रचला 'डेड एंड' सापळा

‘क्राइम पेट्रोल’ हा लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेचा कार्यक्रम पाहून पोलिसांना चकवा देण्याची युक्ती शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून अटक केली आहे. आरोपी चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी सापळा रचत त्याला जमिनीवर झडप घालून पकडले. या थरारक कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अटक…

Read More

आषाढी वारीपूर्वी मोठा निर्णय!:23-24 जून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद; विठुरायाच्या मूर्तीवर होणार विशेष संवर्धन प्रक्रिया

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) विशेष संवर्धन आणि लेपन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने देशभरातील वारकरी, भाविक आणि पर्यटकांना…

Read More