Headlines

पाचोडमध्ये घराचा स्लॅब भरताना खाली पडून 24वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू:स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडले, छाती, डोक्याला गंभीर मार‎

येथील शिवाजीनगर भागात घराचा स्लॅब भरण्याचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१२ जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. प्रदीप मुकेश पिंपळे (रा. पाचोड) असे मृताचे नाव आहे. . प्रदीप पिंपळे यांचे कुटुंब तीस वर्षांपासून पाचोड येथे वास्तव्यास असून, बिगारी व प्लंबिंगच्या कामातून उदरनिर्वाह करत…

Read More

बदल:शालार्थ आयडी मंजुरी, अधिकाऱ्यांना आता फक्त 15 दिवसांचीच डेडलाइन, उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी प्रक्रियेतील दिरंगाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने कडक पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर शालेय शिक्षण विभागाने नवी नियमावली जाहीर केली असून, आता अधिकाऱ्यांना शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी १५ दिवसांची, तर शैक्षणिक संस्थांना त्रुटी दूर करण्यासाठी ७ दिवसांची कडक मुदत देण्यात आली आहे. ठरलेल्या वेळेत काम न केल्यास अधिकाऱ्यांना…

Read More

Shambhuraj Desais Discontent Over BJPs Working Style Post Eknath Shinde Meet

राज्यातील 17 पैकी 6 विधान परिषदांच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यानंतर, आता उर्वरित जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये संपूर्ण राज्याचे लक्ष सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी म . महायुतीमधील या अंतर्गत नाराजीच्या चर्चेला आता खुद्द साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीच दुजोरा दिला आहे. शंभूराज देसाई यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांत कक्ष:पुणे महापालिकेत स्थायी समितीची मागणी मंजूर

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने ‘अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजने’साठी सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना या योजनेचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी या निर्णयाची माहिती दिली. ही योजना कर्करोग, मूत्रपिंड…

Read More

शिवाजी महाराजांचा अज्ञात इतिहास अभ्यासा:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा माहिती नसलेला इतिहास अभ्यासण्याचे आवाहन केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज: द्रष्टे व्यवस्थापक’ या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा…

Read More

पोतरा येथे विशेष ग्रामसभेवर गावकऱ्यांचा बहिष्कार:9 पैकी एकही जागा ओबीसीला आरक्षित झाली नसल्याचे कारण

कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे ग्रामपंचायतीच्या 9 पैकी एकही जागा ओबीसीसाठी आरक्षित झाली नसल्याच्या कारणावरून गावकऱ्यांनी शुक्रवारी ता. 12 विशेष ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत आज घेण्यात आली. त्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. यावेळी मंडळ अधिकारी व्ही. एन. किन्होळकर, ग्राम महसूल…

Read More

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात:दोन दुचाकी, एक रिक्षासह 2.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी आणि एक रिक्षा असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारती विद्यापीठ आणि कात्रज परिसरातून या अल्पवयीन मुलाने दुचाकी व रिक्षा चोरल्या होत्या. मौजमजेसाठी त्याने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कात्रज परिसरातील वंडर सिटी येथे…

Read More

कल्याणमधील गुंडाला डीसीपी अतुल झेंडेंनी चांगलाच धुतला:पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल; किरकोळ कारणावरून गोळीबार

कल्याण पूर्वेतील आत्मारामनगर परिसरात बुधवारी रात्री गुंडगिरीचा एक भयंकर प्रकार उघडकीस आला. वाहनाला कट लागल्याच्या एका अत्यंत किरकोळ कारणावरून गुंडांच्या दोन गटांमध्ये मोठा वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारी आणि गोळीबारात झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. दुर्दैवाने, या दोन गटांच्या संघर्षात एका निष्पाप नागरिकाला गोळी लागली असून, तो गंभीर जखमी झाला आहे. सध्या…

Read More

CM Fadnavis Reveals Farmer Loan Waiver Benefits; Govt Ready for El Niño

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषविल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतीसमोरील आव्हाने आणि आगामी एल निनोच्या परिणामांबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. कर्जमाफीवर विरोधका . कर्जमाफीत अटी नाहीत, फक्त बँकिंग व्यवस्था वाचवण्यासाठी एक तरतूद फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत कोणत्याही कठोर अटी किंवा शर्ती घातलेल्या…

Read More

तुळापुरात शिवकालीन गडकोट संवर्धनाचा महायज्ञ:21 जूनला हजारो मावळे इतिहास रक्षणासाठी एकत्र येणार- खासदार निलेश लंके

पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी शिवकालीन गडकोट संवर्धन, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे भव्य मोहीम आयोजित करण्यात आली आहे. खासदार नीलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत 21 जून 2026 रोजी होणाऱ्या या ‘तुळापूर मोहिमेची’ घोषणा केली. खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमात राज्यभरातील अनेक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. 21…

Read More