Headlines

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात:नमस्कार फक्त ताकदीला अन् चमत्काराला होतो, छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

राज्यसभेची उमेदवारी हुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अत्यंत सूचक आणि धारदार वक्तव्ये करत असून, त्यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. “गेल्या २६ वर्षांत काहीजण मेहनतीने पुढे आले, तर काहीजण कष्ट न करताच थेट पुढे निघून गेले,” असा टोला लगावत भुजबळांनी पक्षातल्याच काही नेत्यांवर निशाणा…

Read More

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 'युझर चार्जेस'ला स्थगिती:राज्य सरकारने व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे घेतला निर्णय, विशेष समिती गठित

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने लागू केलेल्या ‘युझर चार्जेस’च्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. व्यापारी संघटनांनी या शुल्कवाढीला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत, दि पूना मर्चंट्स चेंबर आणि महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेण्यात आली….

Read More

डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते बिशप स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन:'शाळेने माझ्या आयुष्याचा भक्कम पाया घातला', पूनावाला यांचे प्रतिपादन

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांच्या हस्ते कॅम्प परिसरातील द बिशप स्कूलच्या नवीन शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. पूनावाला यांनी सांगितले की, बिशप स्कूलने त्यांना केवळ शिक्षण दिले नाही, तर त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया घातला. शाळेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास आपण कायम तयार असल्याचेही त्यांनी…

Read More

ठाण्यात संतापजनक प्रकार!:किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी ताब्यात

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर किरकोळ वादातून एका वृद्ध नागरिकाला ओला चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण करणारा व्यक्ती परप्रांतीय असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात आले आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाबाहेर सोमवारी सायंकाळी एका किरकोळ कारणावरून वृद्ध व्यक्ती आणि…

Read More

नवले पुलाजवळ सिमेंट मिक्सर उलटला, दुचाकीस्वार जागीच ठार:पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात, चालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील नवले पूल परिसरात बुधवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर उलटल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. नऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पल्स हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. नऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक लेलंड…

Read More

साेलापूर महापालिकेचा अजब कारभार!:आदिला नदीच्या पात्रात थेट स्वखर्चाने पूल बांधण्याची बेकायदा परवानगी, मनपाचे अधिकारीच आता आरोपीच्या पिंजऱ्यात

आदिला नदीवर स्वखर्चाने लहान पूल बांधण्याची बेकायदा परवानगी खुद्द महापालिकेनेच दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे, तर पुलाचे बांधकाम होईपर्यंत नदीचा प्रवाह वळवण्यासही सहमती दिली. त्यापोटी एका व्यक्तीकडून 3 लाख 19 हजार रुपयांचे देखरेख शुल्क आकारले. नदीपात्रात कोणत्याही बांधकामाला परवानगी देण्याचा अधिकार महापालिकेला नाही. आवश्यक असलेल्या बांधकामासाठी जलसंपदा विभागाची ‘ना-हरकत’ (एनओसी) हवी असते….

Read More

शहरामध्ये वादळी पावसाचे थैमान; युद्धपातळीवर मदतकार्यास सुरूवात:आयुक्त वर्षा लड्डा यांनी केली पाहणी; जनजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न

शहरात सोमवार, ८ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन नुकसान झाले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्या. वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही भागांत वाहनांवर झाडे कोसळली. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर फांद्या पडल्या. गंभीर धोका निर्माण झाला होता. या आपत्कालीन परिस्थितीची…

Read More

छत्रपती संभाजीनगरात मुलाकडून वडिलांची हत्या:आरोपी फरार, शोधासाठी पथके रवाना

छत्रपती संभाजीनगरात पोटच्या मुलानेच वडिलांचा जीव घेतल्याचा प्रकार बाबर कॉलनीत मंगळवारी (9 जून) घडला. मती शेख असे मृताचे नाव आहे. संशयित आरोपी मुलगा अजीऊल शेख (19) हा पसार असून, त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. मूळ प. बंगालचे मती शेख हे मुलगा शाहीन, अजीऊल शेख (19) यांच्यासह बाबर कॉलनीत…

Read More

‘अपघात मुक्त अकोला’साठी 46 ठिकाणी नाकाबंदी केंद्र:पोलिस अधीक्षक कार्यालयात रस्ता सुरक्षा बैठकीत निर्णय‎

जिल्हा पोलिस व संबंधित विभागांच्या वतीने मंगळवारी ९ जून रोजी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघात व रस्ता सुरक्षा विषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात अपघात कमी करण्यासाठी ‘अपघात मुक्त अकोला’ हे अभियान राबवण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यामध्ये दोन सत्रांत ४६ ठिकाणी नाकाबंदी केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची…

Read More

चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करण्याची मागणी:महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून परिवहन मंत्र्यांना लेखी निवेदन‎

चालक कर्मचारी यांना नियमित वेतनश्रेणीवर रुजू करून घेण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना सादर केलेल्या निवेदनातून केली. तसेच याप्रसंगी कामगार सेनेतर्फे ना. सरनाईक यांचा सत्कारही करण्यात आला. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने नियमित वेतनावर कर्मचाऱ्यांना रूजू करून घेण्याच्या मागणीसाठी काही कर्मचाऱ्यांचे उदाहरणंही दिली. अकोला आगार…

Read More