मध्यरात्रीचा थरार:गंगापूरला एफडीए अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून 30 गोण्या गुटखा पळवला, दोन जणांना अटक, पळवलेल्या टेम्पोचा शोध सुरू
प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न सुरक्षा विभागाच्या पथकावर पाळत ठेवत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील रहीमपूर येथे सोमवारी (८ जून) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. सहायक आयुक्त विवेक पाटील, अधिकारी फरीद सिद्दिकी आणि नमुना सहायक अमोल कांबळे यांचे पथक वैजापूरहून रहीमपूर येथील एम.जी.के. रोलर फ्लोअर मिल परिसरात दाखल झाले. तेथे…