![]()
हिंगोली येथील भारतीय स्टेट बँकेसमोरील अधिकाऱ्यांच्या वसाहतीजवळ पाच दिवसांचे अर्भक फेकून देणाऱ्या निर्दयी मातेचा अखेर हिंगोली शहर पोलिसांनी मंगळवारी ता. ९ ग्रामीण भागातील एका गावातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्या महिलेवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.या निवासस्थानांच्या बाजूलाच असलेल्या काट्यांमधून बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर काही नागरीकांनी तेथे पाहणी केली असता काट्यांमधे नवजात अर्भक असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, जमादार अशोक धामणे, सुनील अंभोरे, ज्ञानेश्वर मस्के, बालाजी डवरे, गणेश लेकुळे, गणाजी पोटे, गजानन मस्के यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन नवजात अर्भकास काट्यातून बाहेर काढले. सदर अर्भक पुरुष जातीचे असून चार ते पाच दिवसांपुर्वी जन्मलेले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अर्भकास तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या निर्दयी मातेचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी शासकिय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात जाऊन पाच दिवसांपुर्वी जन्मलेच्या बाळाची माहिती घेतली तसेच बाळाचा मातेची माहिती घेऊन त्यानुसार संशयीत महिलांवर लक्ष ठेवण्यास सुरवात केली होती. हिंगोली तालु्क्यातील एका गावातील महिलेने पाच दिवसांपुर्वी एका महिलेला जन्म दिला असून आता त्या महिलेकड बाळ नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तातडीने गावात जाऊन महिलेचा शोध घेतला अन तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी महिलेची चौकशी केली असता दोन महिन्यापुर्वीच पतीचे निधन झाल्याने आता बाळाला कसे सांभाळावे याची चिंता लागली होती तर बाळ हिंगोलीत उलटी करीत असल्याने घाबरून त्याला फेकून दिल्याचे महिलेने सांगितले. पोलिसांनी महिले विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
Source link
पतीच्या निधनानंतर पोटच्या गोळ्यालाच फेकले काट्यात!:हिंगोलीत 5 दिवसांच्या बाळाला सोडणाऱ्या जन्मदात्रीला अटक