हलगर्जीपणा:बैठक होत नसल्याने निराधार योजनेचे 542 प्रस्ताव धूळखात, आ. विवेक कोल्हे यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे
तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा संपूर्ण कारभार सध्या रामभरोसे चालला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या प्रचंड हलगर्जीपणामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील तब्बल ५४२ गरिबांचे नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयात मागील अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या समित्यांच्या बैठकांचे वेळेवर आयोजन होत नसल्याने गोरगरीब, वयोवृद्ध आणि निराधार…