Headlines

पंढरपूर सायकलवारीत राज्यातील 4 हजार सायकलस्वार सहभागी होणार:12 जुलै रोजी रेल्वे मैदानावर रंगणार सायकल रिंगण सोहळा

राज्यातून पंढरपूर सायकलवारीला सोमवारपासून ता. 5 सुरवात होणार असून यावर्षी तब्बल 4 हजारपेक्षा अधिक सायकलस्वार यावारीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे मागील पाचवर्षापासून सुरु असलेली सायकलवारीची परंपरा यावर्षीही कामय राहणार असून सायकलद्वारे आरोग्य राखण्यासोबत वारीतून भक्तीचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे. राज्यात सायकल संघटनेच्या वतीने मागील पाच वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त सायकलवारी केली जाते. राज्यभरातील सायकलस्वार…

Read More

युवकांच्या पुढाकाराने सीना नदीत पुन्हा पाणी:स्ववर्गणीतून चारी खोदून 3 कि.मी.वरून आणले पाणी; नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा‎

सीना नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने बोरगाव, दिलमेश्वर व करंजे परिसरातील शेतकऱ्यांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पावसानेही पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र या परिस्थितीत काही युवकांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या सहकार्याने नदीपात्रात अडकलेले दगड, वाळूचे थर व इतर अडथळे हटवून आलेश्वरपासून बोरगावपर्यंत चारी खोदून पाणी आणले. त्यामुळे या तीन गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

Read More

हद्दवाढीमध्ये दररोज पाणी; कचऱ्यातून खतनिर्मिती अन् 15 ऑगस्टपासून बस:शहर सुधार आघाडीकडून 150 दिवसांचा लेखाजोखा सादर‎

येथील महानगरपालिकेत सत्ता स्थापन करून १५० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त ‘शहर सुधार आघाडी””ने अकोला शहराच्या विकासाचा लेखाजोखा शनिवारी (दि.४) पत्रकार परिषदेत मांडला. आमदार रणधीरभाऊ सावरकर, पालकमंत्री आकाश फुंडकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली आहे. भविष्यातील योजनांची घोषणा यावेळी करण्यात आली. याप्रसंगी आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, स्थायी…

Read More

आंतरराज्य गुन्हेगारीला बसणार चाप; यंत्रणेत प्रभावी समन्वय:महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची परतवाड्यात बैठक‎

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शनिवारी (दि. ४) महत्त्वाची घडामोड घडली. अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या पुढाकाराने परतवाडा येथे महराष्ट्र व एमपी राज्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ‘आंतरराज्य समन्वय बैठक’ पार पडली. या बैठकीमुळे दोन्ही राज्यांतील पोलीस यंत्रणेत आता अधिक प्रभावी समन्वय निर्माण होणार…

Read More

दोन पुरात वाहून गेले, दोघांवर वीज कोसळली:जून महिन्यात चार बळी, 134 जण जखमी, 500 हून अधिक घरांची पडझड‎

जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नसला तरी त्या महिन्यातील पावसाने ४ बळी घेतले असून इमारतींची पडझड व पावसाशी संबंधित इतर आपत्तीमुळे १३४ जण जखमी झाले आहेत. वादळ-वारा आणि जोराचा पाऊस यामुळे सुमारे ५०० हून अधिक घरांची पडझड झाली. शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जूनच्या पावसामुळे १४ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांतील ४ शहरे आणि २६ गावे बाधित…

Read More

बार्शीत नऊ दिवसाआड पाणीपुरवठा:296 कोटी ख र्चाच्या कामात महामार्ग व शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनाचा वाद‎

शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती अत्यंत बिकट आणि तीव्र पाणीटंचाईची आहे. सध्या बार्शीकरांना ४ ते ६ दिवसाआड किंवा काही भागात ८ ते ९ दिवसांनंतर विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत (३० जून २०२६) आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. बार्शी शहराला दररोज २ कोटी ५० लाख (अडीच कोटी)…

Read More

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची आवश्यक:साहेबराव नागणे यांचे उपरीमध्ये प्रतिपादन, देशमुख हायस्कूलमध्ये कराटे प्रशिक्षण शिबिर‎

सध्या दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून दररोज महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मुलींची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलींना सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील प्रत्येक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक पैलवान…

Read More

गणिताची भीती सोडा, विद्यार्थ्यांत दडलाय संशोधक:विद्यार्थ्यांनी न भिता प्रश्न विचारावेत, प्रा. सचिन राळेगणकर यांचे आवाहन‎

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती आवश्यक असते आणि या सर्व गुणांचा पाया गणित घालते. गणिताची भीती न बाळगता त्याचा आनंदाने अभ्यास केल्यास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संशोधक दडलेला आहे. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय लावावी, असे आवाहन प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक…

Read More

सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजन व परिश्रमाच्या बळावर मिळते यश:पोलीस उपायुक्त इंगळे यांचे प्रतिपादन; पुरस्कार वितरण उत्साहात‎

यशाला कोणताही शॉर्टकट नसतो; कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणताही विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही अपार क्षमता असून योग्य ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास पोलीस, प्रशासकीय सेवा, तसेच विविध शासकीय क्षेत्रांतील उच्च पदे सहज गाठता येतात, असा विश्वास पिंपरी चिंचवड येथील पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी…

Read More

मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक‎

शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने…

Read More