मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक
शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने…