दिंडी मार्गावर 500 झाडांची लागवड सुरू:विविध संस्था, सेवा मंडळांकडून सामाजिक, धार्मिक उपक्रमांचेही आयोजन
संत नगरी प्रसाद मंडळ व चिरंतन फाऊंडेशनद्वारा अकोट ते पंढरपूर दिंडी मार्गावर ५०० पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात येत असून या पर्यावरण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराज दिंडी सोहळ्याचे पंढरपूरला २६ जूनला प्रस्थान झाले. यानिमित्त अनेक संस्था व सेवा मंडळांकडून विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच अंतर्गत…