Headlines

'राणे स्टाईलने उत्तर देण्याचे दिवस गेले':विनायक राऊत यांची सडकून टीका, मुंबईतील परिस्थितीवरून सरकारला धरले धारेवर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकार, भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून त्यांनी मुंबई महानगरपालिका आणि भाजपच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्ग, कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प, रामरक्षा आंदोलन आणि पक्षांतराच्या राजकारणावरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली….

Read More

सहकाऱ्याच्या अघोरी कृत्याने कामगाराचा मृत्यू;:गुदद्वारात सोडली कॉम्प्रेसरची उच्च दाबाची हवा, पुण्यातील सणसवाडीत धक्कादायक घटना

पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना सणसवाडी औद्योगिक वसाहतीमधून उघडकीस आली आहे. एका कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना, एका सहकाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवला. या भयानक कृत्यामुळे पोटात प्रचंड दाबाने हवा गेल्याने, एका ४२ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा उपचारादरम्यान अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिक्रापूर…

Read More

Bhandup LBS Marg Road Collapse; Heavy Rain Havoc

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. माटुंगा आणि दादरमध्ये झाडे पडल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज (शनिवारी) दुपारी भांडूपमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली. भांडूप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर एशियन . नेमकी दुर्घटना कशी घडली? भांडूपमधील सोनापूर परिसरात एलबीएस मार्गालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी खूप खोलवर खड्डा खोदण्यात आला…

Read More

कर्जमाफीत एकही शेतकरी वंचित राहणार नाही:राम मंदिरातील चोरांना योगी सरकार सोडणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा विश्वास

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत करत, “एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला. तर राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणात “चोरी करणाऱ्यांना योगी आदित्यनाथ सरकार कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा करेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी चंद्रपूरमधील भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मात्र बोलण्यास त्यांनी…

Read More

पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना…

Read More

नाना पटोलेंचा भाजप- RSS वर गंभीर आरोप:म्हणाले- राम मंदिराच्या देणग्या लुटल्या, यात मोदींपासून भागवतांपर्यंत सगळेच सामील; प्रभू श्रीराम यांना सोडणार नाहीत

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, काँग्रेसन नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्वच जण सामील असल्याचा दावा पटोले यांनी नागपुरात बोलताना केला. तसेच, केवळ अयोध्येतच…

Read More

शनिवारवाडा परिसरातील विकासबंदी अन्यायकारक; तातडीने फेरविचार करा:माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी दिला अनुच्छेद 14 चा हवाला

शनिवारवाड्याच्या ऐतिहासिक जलव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्याचा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि केंद्र सरकारचा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, या निमित्ताने शनिवारवाडा परिसरातील नागरिकांवर अनेक वर्षांपासून लादलेली विकासबंदी अन्यायकारक असल्याचे मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या विकासबंदीचा तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात, माजी आमदार धंगेकर यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे महासंचालक आणि…

Read More

राज्यात महामार्गांवर अग्नितांडव:समृद्धीवर धावत्या कारने घेतला पेट, तर दौंडमध्ये टेम्पो भस्मसात; सुदैवाने जीवितहानी नाही

राज्यातील दोन प्रमुख महामार्गांवर वाहनांना अचानक भीषण आग लागल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला, तर दुसरीकडे दौंडजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर एका उभ्या मालवाहू टेम्पोला आग लागली. सुदैवाने, या दोन्ही थरारक घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. मात्र, दोन्ही वाहने जळून खाक झाली…

Read More

ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपली:ॲडमिशन हुकल्याने कल्याणमधील 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या नैराश्यातून कल्याणमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता; मात्र ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचे समजल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षदाने नुकतीच वाणिज्यशाखेतून बारावीची…

Read More

दिंडी मार्गावर 500 झाडांची लागवड सुरू:विविध संस्था, सेवा मंडळांकडून सामाजिक, धार्मिक उपक्रमांचेही आयोजन‎

संत नगरी प्रसाद मंडळ व चिरंतन फाऊंडेशनद्वारा अकोट ते पंढरपूर दिंडी मार्गावर ५०० पर्यावरणपूरक झाडांची लागवड करण्यात येत असून या पर्यावरण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. संतश्रेष्ठ श्री वासुदेव महाराज दिंडी सोहळ्याचे पंढरपूरला २६ जूनला प्रस्थान झाले. यानिमित्त अनेक संस्था व सेवा मंडळांकडून विविध धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच अंतर्गत…

Read More