Headlines

मुंबईत कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढून 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार:अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक, 4 फरार

मुंबईलगतच्या मिरारोड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षांच्या एका शाळकरी मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून, तो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत सहा नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन आरोपींना गजाआड केले आहे, तर उर्वरित चार फरार आरोपींचा शोध सुरू…

Read More

कुंभमेळ्याच्या नावाने 500 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर:9 ठेकेदारांकडून 65 लाख उकळले, नाशिक पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले

नाशिक कुंभमेळ्यासाठी ३२ हजार कोटींची कामे होणार आहेत. त्याचा फायदा घेऊन गंडा घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यात काही ठकांनी चक्क नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट सही ठोकून ५०० कोटींचे बनावट टेंडर काढले. एवढेच नव्हे तर ९ ठेकेदारांकडून काम मिळवून देण्यासाठी ६५ लाख रुपये उकळून मूळ वर्क ऑर्डरमध्ये कॉपी-पेस्ट करून बनावट वर्क…

Read More

बिडकीनमध्ये ऑरिकशेजारीच एमआयडीसीला हवी 2 हजार हेक्टर जागा:5 मोठ्या उद्योगांकडून जमिनीसाठी विचारणा केल्यानंतर एमआयडीसीचा सरकारकडे प्रस्ताव

ऑरिकने बिडकीनमध्ये विस्तार करण्यासाठी ३२०० हेक्टर जमिनीची सरकारकडे मागणी केल्यानंतर आता त्यालगतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही (एमआयडीसी) नव्या औद्योगिक वसाहतीसाठी २ हजार हेक्टरची जागा मागितली आहे. गेल्या महिनाभरात ५ मोठ्या कंपन्यांनी भूखंडांसाठी विचारणा केल्यानंतर एमआयडीसीने जागेच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. प्रस्तावित वसाहतीसाठी सरकारने जमिनी दिल्यास ही शहर-परिसरातील नववी एमआयडीसी…

Read More

शहरातील पाचपैकी एक मतदार पडताळणीबाहेर!:पारनेर, कर्जत-जामखेडमध्ये 38,31 हजार नोंदी अनकलेक्टेबल ; 4.29 लाख मतदारांची पडताळणी बाकी‎

विशेष सखोल मतदारयादी पुनर्रचनेत (एसआयआर) जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमधील तब्बल ४ लाख २९ हजार १०८ मतदारांच्या नोंदी पडताळणीबाहेर (अनकलेक्टेबल) असल्याचे ११ ऑगस्टच्या अहवालातून समोर आले. हे प्रमाण जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या ११.२६ टक्के आहे. विश . 1) मतदार ‘पडताळणीबाहेर’ म्हणजे काय? एसआयआरमध्ये घरभेटीद्वारे मतदारांची पडताळणी केली जाते. मतदाराची माहिती निश्चित करता न आल्यास किंवा त्याची सध्याची…

Read More

शिवचरित्र आदर्श मानून राजाभाऊंनी केलेले कार्य अभिमानास्पद:कर्तृत्व आणि दातृत्व म्हणजेच आमदार राऊत‎

छत्रपती शिवरायांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून अठरापगड जातीच्या घटकांना बरोबर घेऊन आमदार राजेंद्र राऊत यांनी सकल समाजघटकांना न्याय देत केलेले लोकसेवा आणि विकासाचे काम अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढले. येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार राऊत यांची विधानपरिषद सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आयोजित केलेल्या जाहीर सत्कार…

Read More

आयुक्तालयासह महसूलमध्ये पदोन्नती घोटाळा:न्यायालयाने फटकारल्यानंतरही सुधारणा नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे 15 ला आंदोलन‎

विभागीय आयुक्त कार्यालयासह तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, भातकुली व चांदूर रेल्वे येथे कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी खोट्या मानीव दिनांकाचा आधार घेत पदोन्नती मिळविल्या. एवढेच नव्हे तर आर्थिक लाभही लाटले. ही चूक लक्षात आणून देत हे प्रकरण पुढे न्यायालयात गेले. दरम्यान न्यायालयाने फटकारल्यानंतरही महसूल प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली नाही. त्यामुळे निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले…

Read More

विद्यापीठाचा ऐतिहासिक पुढाकार; महाराष्ट्रासाठी ठरणार दिशादर्शक:एनईपी 2020 अंतर्गत कार्यभार नियोजनासाठी एकदिवसीय प्रशिक्षण‎

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० मुळे उच्च शिक्षण व्यवस्थेत झालेल्या व्यापक बदलांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमधील शैक्षणिक कार्यभार निश्चिती आणि आवश्यक पदसंख्या निर्धारणाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने पुढाकार घेत तयार केलेले विनियम क्र. ११ व १२/२०२६ हे महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित…

Read More

कुत्र्यांचा हल्ला, मच्छरांचा उद्रेक; साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त:साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती; नगरपालिकेचे दुर्लक्ष‎

मूर्तिजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्य व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहर पोलीस स्टेशन परिसरासह विविध भागात शेकडो भटके कुत्रे मुक्तपणे वावरत असून, स्थानिक नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असल्याने महिला, ज्येष्ठ…

Read More

घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी ५ ते ६ जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात…

Read More

यंदाच्या श्रावणात खुलताबादेत भद्रा मारुतीचे दर्शन तासाभरातच होणार:शुक्रवार अन् शनिवारी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक येण्याची शक्यता

श्रावण महिन्यात घृष्णेश्वराच्या दर्शनासोबतच भद्रा मारुती मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा 10 लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी भाविकांची मोठी गर्दी असणार आहे. त्यासाठी भद्रा मारुती विश्वस्त मंडळाने विशेष नियोजन केले आहे. भाविकांना अवघ्या तासाभरातच दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच पावसापासून बचावासाठी तीन…

Read More