अखेर गडचिरोली प्रशासन जागे:सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर आश्रमशाळांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमावली जारी
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सर्पदंश प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे परिपत्रक जारी केले आहे. ही दुःखद घटना 10 ऑगस्ट रोजी घडली. यात तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…