Headlines

विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 3 दिवस पाऊस:मध्य प्रदेशातील कमी दाबाच्या पट्ट्याचा 15 राज्यांत परिणाम, मुंबईत दरड काेसळून 7 ठार

उत्तर-पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील ३ दिवस मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात हे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण…

Read More

कुंभमेळा:591कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर देणारा मंत्री महाजनांचा नातेवाईक, ठेकेदारांकडून 3 कोटी उकळणाऱ्या तिघांना जामनेर येथून अटक

आगामी कुंभमेळ्यात कामांसाठी ठेकेदारांना ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर देत ३ कोटी ५० हजार रुपये उकळणारा मंत्री गिरीश महाजन यांचाच दूरचा पुतण्या असल्याचे उघड झाले. मंगळवारी या प्रकरणात महाजनांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर येथून तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन, शकील अहमद सलीमउद्दीन शेख (मूळ रा. धुळे) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी मंत्री महाजनांनीच…

Read More

आनंदराज आंबेडकर म्हणाले-:SC उपवर्गीकरण आरक्षणातील जागा खुल्या प्रवर्गाकडे वळवण्याचे षडयंत्र; संभाजीनगरमध्ये महामोर्चा

छत्रपती संभाजीनगर येथे अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाच्या विरोधात गुरुवारी महामोर्चा काढण्यात आला. आनंदराज आंबेडकर यांनी या उपवर्गीकरणाला आरक्षणातील जागा अप्रत्यक्षपणे खुल्या प्रवर्गाकडे वळवण्याचे षडयंत्र म्हटले आहे. सरकार आंबेडकरी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत काढलेल्या या भव्य मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. राज्य सरकार…

Read More

'विरोधकांना शब्दांनी नव्हे, कामातून उत्तर देईन':उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा निर्धार, देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार

काँग्रेसच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या इंग्रजी भाषेतील भाषणाचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करत त्यांची खंबीर पाठराखण केली, तसेच ‘महिला राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत’ ही विरोधकांची संकुचित मानसिकता असल्याचा सणसणीत टोलाही लगावला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या भक्कम पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, महिला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या…

Read More

दोन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर जखमी:कळमना परिसरात उभ्या ट्रकला कारची धडक

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावनगाव ते भरतवाडा वाय-पॉईंट दरम्यान बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या तीन अल्पवयीन मित्रांच्या कारने उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, कारचालक मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्दैवी घटनेत भौमिक अमोल लारोकर (वय…

Read More

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एनसीडीसीकडून ५ हजार कोटींचे कर्ज मंजूर:सहकारी संस्था व शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल उपलब्ध होणार

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर झाले आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील एनसीडीसीने हे कर्ज ‘डायरेक्ट फंडिंग स्कीम’ अंतर्गत दिले आहे. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मिळवणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. एनसीडीसीने १० ऑगस्ट २०२६ रोजी…

Read More

पुण्यातला हा खड्डा पाहिलात का?:काकांनी थेट खड्ड्यातच मांडला ठिय्या; अप्पर इंदिरानगरमधील 'त्या' VIDEOची हवा जोरात

पुण्याचे रस्ते आणि खड्डे यांचं एक वेगळंच ‘सख्य’ आहे, पण सध्या सोशल मीडियावर अप्पर इंदिरानगर भागातील एका खड्ड्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. नेहमीप्रमाणे नुसतीच चर्चा किंवा तक्रार न करता, एका पुणेरी काकांनी थेट या तीन फूट खोल खड्ड्यात उतरून प्रशासनाचा अनोख्या शैलीत निषेध केला. त्यांच्या या ‘खड्डे आंदोलना’चे फोटो आणि व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत…

Read More

"CSMT वरून सुटणाऱ्या लोकलमध्ये 'शिवरायांचा' जयघोष व्हावा":विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा उद्घोषणा ध्वनीक्षेपकावरुन देण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांनी त्यांना…

Read More

पेपरफुटी रोखण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल:सेवाभरती परीक्षांसाठी उच्चस्तरीय समिती गठीत, CM देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

राज्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने उघडकीस येणाऱ्या पेपरफुटी आणि महत्त्वाच्या परीक्षांमधील गैरप्रकारांची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाभरती परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक व अधिक सुरक्षित सुधारणा करण्यासाठी आज एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या बैठकीला उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत काही उपयुक्त सूचना केल्या असून, ही नव्याने गठीत…

Read More

परवडणारी क्षमता अट रद्द करा:बीएसएनएल कर्मचाऱ्यांची वेतन-पेन्शन सुधारणेची मागणी

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन सुधारणेसाठी कंपनीच्या नफा-तोट्यावर आधारित ‘परवडणारी क्षमता अट’ रद्द करण्याची मागणी बीएसएनएल कर्मचारी व पेन्शनर्स संघटनांनी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. ही अट अन्यायकारक असून ती तातडीने शिथिल किंवा रद्द करावी, असे संघटनांनी म्हटले आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएलची स्थापना १…

Read More