Headlines

मावळमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव 2026-27' उत्साहात साजरा:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत




पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी ‘पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे’ येथे भेट देऊन नवीन शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी नवोदित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, भावी पिढीला सक्षमपणे घडवण्यासाठी आधुनिक व दर्जेदार शिक्षण देण्यासोबतच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावर मागे पडू नयेत यासाठी शासन डिजिटल क्लासरूम व दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अभ्यासासोबतच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मावळ तालुक्यात उत्तम क्रीडांगणे आणि क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत. त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक टॅबपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ४ केंद्रप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते डिजिटल टॅब प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे याच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी रुद्रा गणेश राजगुरे हिचा विशेष सत्कार. रुद्राने चाचणी परीक्षेत यश मिळवून अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेला भेट देण्याचा बहुमान मिळवला होता. मावळ तालुक्याचा आणि राज्याचा गौरव वाढवणाऱ्या रुद्राचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर गजानन पाटील, दिपाली हुलावळे, सुनीता येवले, गणपतराव मोरे (उपसंचालक, शिक्षण विभाग), भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी), शेखर गायकवाड (माजी साखर आयुक्त), गणेश ढोरे, विठ्ठल आण्णा शिंदे, गणेश खांडगे, साहेबराव कारके यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि चिमुकले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *