यात्रेच्या तोंडावर बुवासिद्ध देवस्थानावर वाद:फलकावरून राहुरीमध्ये संताप, वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख असलेल्या फलकाला विरोध
राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव यांच्या यात्रा उत्सवाला बुधवारपासून (२९ जुलै) प्रारंभ होत असताना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकामुळे शहरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलकावर वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख करत मंदिर परिसरात ध्वज लावणे, आरती करणे, घोषणाबाजी करणे, धार्मिक विधी करण्यास मनाई असल्याचा मजकूर नमूद केला आहे. या फलकाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत…