श्रीकृष्ण मंदिरात लीळाचरित्रावर निरुपण:उद्यापासून 9 ऑगस्टपर्यंत दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा करणार प्रवचन
अमरावती येथील माताखिडकी स्थित द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात गुरुवार, ३० जुलैपासून लीळाचरित्र निरुपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प. पु. श्री दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा महानुभाव हे निरुपण करणार आहेत. महानुभाव वासनिक सेवा मंडळ आणि श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अगम्य लीळांवर आधारित हे निरुपण दररोज…