Headlines

आदिवासी महिलेच्या कागदपत्रांचा गैरवापर; खात्यात आले 42 लाख:नाशिकमधील प्रकार, सायबर फ्राॅडमधील रक्कम वळवल्याचा संशय

शासकीय योजनेसाठी आधार व पॅन कार्ड दिलेल्या एका आदिवासी गरीब महिलेच्या नावाने बँक खाते उघडून खात्यात तब्बल ४२ लाखांची रक्कम जमा केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २७) देवळाली कॅम्प येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत उघडकीस आला. ही रक्कम सायबर फ्रॉडमधून वळवण्यात आल्याचा संशय असून कोणत्या खात्यांमधून ती जमा झाली, याची यादी मिळवण्यासाठी तांत्रिक मदत घेतली जात…

Read More

सराफा दुकानातून दीड तोळ्याची ‎सोन्याची अंगठी घेऊन भामटा फरार‎:गंगापुरात संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद‎

गंगापूर शहरातील अत्यंत गजबजलेल्या राजीव गांधी चौक परिसरातील ‘महेंद्र ज्वेलर्स’ या सराफा दुकानातून एका अज्ञात भामट्याने भरदिवसा चलाखीने सोन्याची अंगठी लांबवल्याची धक्कादायक घटना घडली. सोमवारी (27 जुलै) दुपारी दोनच्या सुमारास ही चोरी झाली. ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपीला नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन केले…

Read More

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून उज्ज्वल भविष्य घडवावे‎:अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. डी. चव्हाण यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अहिल्यानगर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार, कायद्याचे ज्ञान आणि व्यसनमुक्त जीवनशैली तितकीच महत्त्वाची आहे. व्यसनामुळे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून आणि व्यसनांपासून कायम दूर राहून वाचन, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि सकारात्मक छंदांचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र…

Read More

श. प. राष्ट्रवादी एनडीएच्या वाटेवर असल्याची चर्चा:शहा यांना सुळेंनंतर तटकरेही भेटले, केंद्रात एक अन् राज्यात दोन मंत्रिपदांची गणितं?

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वातील ‘एनडीए’त सहभागी होण्याच्या हालचाली तीव्र केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरेंनीही शहा यांची स्वतंत्र भेट घेतल्याने राजकीय भूकंपाची चर्चा वाढली आहे. चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी दिल्लीत विद्यार्थी आंदोलक…

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त यात्रीनिवासचे बुकिंग फुल्ल:अन्नछत्र 12 तास सेवेत, श्री स्वामी समर्थ मंदिर, अन्नछत्र मंडळासह समाधी मठाची गुरुपौर्णिमा उत्सवाची तयारी उत्साहात

श्री गुरुपौर्णिमा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह समाधी मठ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. भक्तनिवास, यात्री निवासाचे बुकिंग फुल्ल झाले असल्याचे व्यवस्थापनाने कळवले आहे. स्वामी समर्थांचे मंदिरात होणारी भाव . श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे बुधवारी मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे ४ वाजता होईल. गर्दी…

Read More

ठाण्यात दुर्घटना:इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून 13 वर्षीय मुलीचा मृत्यू, 5 जणांची सुखरूप सुटका

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात सोमवारी संध्याकाळी एका ४० वर्षे जुन्या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबून एका १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अन्य ५ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला मोठे यश आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने संपूर्ण इमारत रिकामी केली असून नागरिकांना…

Read More

टिटंबाप्रकरणी जणांवर गुन्हा; ‘सेंट्रल किचन’ बंद:अधीक्षक निलंबित, दोघांना ‘शो कॉज’ नोटीस‎

धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत रात्रीच्या जेवणानंतर ६९ विद्यार्थ्यांना विषबाधा सदृष्य लागन झाल्याची घटना २५ जुलैला रात्री समोर आली होती. या विद्यार्थ्यांना जेवनानंतर त्रास झाल्यामुळे प्रथमदर्शनी जेवणामुळेच विद्यार्थ्यांना प्रकृतीचा त्रास झाल्याच्या निष्कर्षाप्रत यंत्रणा पोहचली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून जेवण दिले जात होते. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरुन धारणी पोलिसांनी सदर सेंट्रल…

Read More

वीज दुरुस्तीवरून नगरसेविकेचे पती अन् कर्मचाऱ्यांत झाला वाद:झाडामुळे प्रभावित झालेला वीज प्रवाह सुरळीत करतानाची घटना‎

येथील पालखी रोड स्थित शांतिनिकेतन कॉलनीतील बंद पडलेला वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणचे कर्मचारी आणि नगरसेविकेचे पती, प्रशांत जाधव यांच्यात काहीसा वाद झाला. मुद्दा पोलिसांत जाईपर्यंतची भाषा बोलली गेली. त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. पर . हवेमुळे उशीरा रात्री शांतिनिकेतन कॉलनीमधील कडूलिंबाचे एक महाकाय झाड जमीनदोस्त झाले. या झाडामुळे एका घराची भिंत आणि…

Read More

नाले गाळाने भरलेलेच; एक कोटी कुठे खर्च झाले? लोकांतून सवाल:नालेसफाईवर महानगरपालिकेकडून 1.09 कोटी रुपयांचा खर्च‎

मनपाने प्रमुख २६५ नाल्यांच्या सफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचे कंत्राट िदले होते. प्रत्यक्षात शहरातील अनेक प्रमुख नाल्यांची पाहणी केली असता, नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेलेच दिसून आले. त्यामुळे एवढा मोठा खर्च नेमका कुठे झाला?, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. बहुतांश लहान-मोठे नाले गाळाने तुंबलेले असताना बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत…

Read More

अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, खासगी नोकर असल्यासारखे वागू नका:माजी आ. राहुल जगतापांचा इशारा; चिमुरड्यांच्या मृत्यूप्रकरणी तहसीलवर मोर्चा‎

लोणीव्यंकनाथ येथील दोन चिमुरड्या बहिणींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आंदोलक तरुणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी श्रीगोंदे तहसील कार्यालयावर लोणी ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना माजी आमदार राहुल जगताप यांनी पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा देत, “तुम्ही आमदार विक्रम पाचपुते…

Read More