Headlines

वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल:अभिनेते सयाजी शिंदे यांचे प्रतिपादन, इंदोरी येथे वाचनालयाचे केले उद्घाटन‎

ग्रामीण भागातून वाचन संस्कृती रुजली तरच समाजाचा खरा विकास होईल. अकोले तालुक्यात इंदोरीसारख्या गावातून अशी चळवळ उभी राहणे खरेच आशादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा वृक्षदूत सयाजी शिंदे यांनी केले. त्यांनी विजया पाडेकर-ठोंबाडे यांच्या सह्याद्री देवराईच्या संकल्पनेलाही पाठिंबा देत निसर्ग संवर्धनासाठी एकत्र येऊन देवराई उभारण्याचे आवाहन केले. “झाड माणसाला श्वास देते आणि पुस्तक विचार देते”…

Read More

कर्मयोगी उपाधी देऊन राज्य शासनाने चांगदेवराव होळकरांचा गौरव करावा:लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनच्या शोकसभेत एकमताने ठराव‎

कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा नाफेडचे माजी अध्यक्ष स्व. चांगदेवराव भागवतराव होळकर यांच्या कृषी, सहकार, शिक्षण आणि शेतकरी हितासाठीच्या आजीवन योगदानाचा गौरव म्हणून त्यांना “कर्मयोगी चांगदेवराव भागवतराव होळकर’ ही उपाधी शासनाने अथवा . दि लासलगाव मर्चन्टस् असोसिएशन व बाजार समिती, लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २७) श्री छत्रपती शिवाजी महाराज नवीन…

Read More

सटाण्यात खड्ड्यांचे जलपूजन करून राष्ट्रवादीची स्वखर्चाने रस्ता दुरूस्ती:1 ऑगस्टपर्यंत काम सुरू‎न झाल्यास रास्ता रोको‎

साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जीवरील सटाणा शहरातून जाणारा जिजामाता उद्यान ते सटाणा बसस्थानकादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २७) तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

खुलताबाद शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा:नागरिक झाले भयभीत, नगरसेवक गजानन फुलारे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, मान्यवरांची उपस्थिती‎

कसाबखेडा परिसरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षांच्या निष्पाप बालकाचा झालेला अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक मृत्यू आणि त्यानंतर संपूर्ण तालुक्यात संताप उसळला. खुलताबाद शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ . येत्या काही दिवसांत जगप्रसिद्ध हजरत जर जरी बक्ष दर्गा उरुस आणि पवित्र श्रावण महिन्यानिमित्त भद्रा मारुती मंदिर परिसरात देश-विदेशातून लाखो भाविक दाखल होणार…

Read More

ऑर्केस्ट्राच्या परवान्याआडून चालणारी डान्स बारमधील छमछम आता बंद होणार:पावसाळी अधिवेशनात विधेयक मंजुरीनंतर गृह विभागाचा निर्णय

डान्स बारविरोधी कायद्यातील अटींना बगल देत ऑर्केस्ट्रा परवान्यांचा गैरवापर करणाऱ्या बारचालकांना राज्य शासनाने दणका दिला आहे. गृह विभागाने २७ जुलै रोजी परिपत्रक काढून नवे ऑर्केस्ट्रा परवाने देण्यावर आणि जुन्यांच्या नूतनीकरणावर पूर्ण बंदी घातली आहे. नियम दोनदा मोडल्यास दंड व निलंबन, तर तिसऱ्यांदा परवाना कायमस्वरूपी रद्द होऊन फौजदारी गुन्हा दाखल होईल. ऑर्केस्ट्राच्या नावाखालील अश्लील नृत्ये रोखण्यासाठी…

Read More

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात ‘पेट स्कॅन’ चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे लागतील. वैद्यकीय शिक्षण सचिवांच्या सूचनेनुसार हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला असून, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी ही माहिती दिली. पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर ही सुविधा २ जुलैपासून सुरू झाली…

Read More

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना!:भरधाव कारच्या धडकेत 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, चालकाला अटक

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनिषनगर परिसरातील आश्रय सोसायटीजवळ एका भरधाव कारने तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे….

Read More

शांतिनिकेतन कॉलनीत नगरसेविकेचे पती, महावितरण कर्मचाऱ्यांत वाद:पडलेल्या झाडामुळे प्रभावित झालेला वीज प्रवाह सुरळीत करतानाची घटना

अमरावती येथील पालखी रोडवरील शांतिनिकेतन कॉलनीत वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामादरम्यान महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक नगरसेविकेचे पती प्रशांत जाधव यांच्यात वाद झाला. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि दुरुस्तीचे काम थांबले होते. रात्री उशिरा जोरदार वाऱ्यामुळे शांतिनिकेतन कॉलनीतील एक मोठे कडुलिंबाचे झाड कोसळले. यामुळे एका घराची भिंत आणि एका कारचे मोठे नुकसान झाले….

Read More

वलगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक:आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यावर भर

आगामी गणेशोत्सव, पोळा, गोकुळाष्टमी आणि ईद यांसारखे सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी वलगाव पोलीस ठाण्यात परिसरातील पोलीस पाटलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वलगाव पोलीस ठाण्याच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत गावागावांमधील कायदा व सुव्यवस्था, स्थानिक समस्या तसेच सणोत्सवाच्या काळात शांतता व सामाजिक सलोखा…

Read More

जायकवाडी धरणात 58 टक्के पाणीसाठा:56 हजार क्युसेक पाण्याची आवक, 9 तासांत 2 टक्क्यांनी वाढ

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, धरणातील पाणीसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. गंगापूरमधून ४९४७ क्युसेक, दारणामधून ५३३० क्युसेक, कडवामधून २३३० क्युसेक आणि पालखेडमधून १९८६ क्युसेक पाणी…

Read More