Headlines

लासलगाव कॉलेजात 100 वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाची शपथ:एनएसएस व एनसीसीचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पर्यावरण शपथ . संस्थेचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी ५० नारळ व ५० चिंचेची अशी एकूण १०० रोपे…

Read More

ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अजिंठा घाटामध्ये ट्रक उलटला:लसणाने भरलेला ट्रक जात होता केरळला‎

अजिंठा घाटातील वळणावर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात लसणाने भरलेला एक ट्रक उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही बचावले असून, ट्रकचे नुकसान झाले आहे. राजस्थानहून केरळच्या दिशेने लसूण घेऊन जाणारा ट्रक (आरजे २० जीसी ४३८१) मंगळवारी सकाळी अजिंठाघाटात…

Read More

‘तू काकाला का बोललीस’ अशी विचारणा करत पत्नीवर झाडल्या 3गोळ्या:पती फरार, नांदेडच्या लोहा येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रकार, पत्नी गंभीर जखमी

‘तू काकाला का बोललीस’ म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरा . लोहा येथे शिक्षक कॉलनी परिसरातील विशाल जाधव व त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री…

Read More

लोणावळा घाटात दरड कोसळल्याने 14 रेल्वे रद्द:मुंबई, पुण्यासह नांदेड, सोलापूर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय

लोणावळा – कर्जत रेल्वे घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. मध्य रेल्वेने मंगळवारी एकूण १४ गाड्या रद्द केल्या तर एक गाडी अंशतः रद्द करुन ५ गाड्यांचे मार्ग वळवले. तीन गाड्या शॉर्ट टर्मिनेट, तीन गाड्या शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या असून एका गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला…

Read More

मंत्री मोहोळांकडून मनपा अधिकाऱ्यांची झाडाझडती:पाणी साचणाऱ्या ठिकाणांवरून पावसाळी तयारीचा घेतला आढावा

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या कमी करण्याबाबत आणि पावसाळ्याच्या तयारीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पुणेकरांना कोणतीही समस्या येऊ नये, असे स्पष्ट निर्देश मोहोळ यांनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असतानाही गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांची संख्या किती कमी केली, असा प्रश्न…

Read More

सातारकरांना मोठा दिलासा:कास धरण सांडव्यावरून वाहू लागले, वर्षभराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर

सातारा शहरासाठी जीवनदायी ठरणारे कास धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे सातारा शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या दमदार पुनरागमनानंतर कास परिसरात सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा थेट परिणाम…

Read More

पुणे मनपा पालखी सोहळ्यासाठी सज्ज; वारकऱ्यांसाठी व्यापक सुविधा:महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून ‘पुणे प्रथम – सेवावारी 2026’ उपक्रम

पुणे महानगरपालिका संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. आषाढी वारीनिमित्त हजारो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी ‘पुणे प्रथम – सेवावारी २०२६’ या उपक्रमांतर्गत शहरात व्यापक नियोजन करण्यात आले आहे. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे आणि प्रमुख ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून…

Read More

पूरस्थितीमुळे देहू-आळंदीत गर्दी टाळा:वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे: डॉ. नीलम गोऱ्हे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी सध्या या ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. शक्य असल्यास, वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूल, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था…

Read More

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच लोणावळा येथील ‘नॉर्थ पॉइंट’ आणि ‘थ्री सिक्सटी रिसॉर्ट’ परिसरात आज अचानक भीषण भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, वाढत्या पावसामुळे…

Read More

Swargate Metro Station Leaks; Pune Metro Faces Criticism After First Rain

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल् . मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या छताला आणि अंतर्गत भिंतींना मोठी गळती लागली आहे. छतातून पडणारे पाणी संपूर्ण स्थानकात पसरून…

Read More