Headlines

इंद्रायणी पुरामुळे आळंदी पालखी सोहळ्यावर निर्बंध:केवळ मर्यादित भाविकांनाच मंदिरात प्रवेश, 8 जुलैला सोहळा

इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे यंदाचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात हा सोहळा साधेपणाने आणि कडक नियमांच्या अधीन राहून आयोजित केला जाईल. संततधार पाऊस आणि पूरपरिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा…

Read More

'नागरिकांचे जीव गेल्यावरच तुम्हाला जाग येते का?':उघड्या मॅनहोलवरील मृत्यूंवरून मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकांना दणका

महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. मुंबईसह इतर भागांमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. त्यातच झाड कोसळण्याच्या घटना व उघडे मॅनहोल असल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. तुम्हाला नागरिकांचे जीव गेल्यावरच जाग का येते? लोकांच्या जीवाला महापालिका काहीच महत्त्व देत नाही का? अशा कडक…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत!:जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे…

Read More

बांधकाम कामगार हाच समाज विकासाचा कणा- आ. राजळे:शासन योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत विस्तार; शेवगाव-पाथर्डीत 19.30 कोटींच्या निधीचे वाटप‎

बांधकाम कामगार हा खऱ्या अर्थाने समाज आणि देशाच्या विकासाचा मुख्य कणा आहे. त्यांच्या कष्टाला योग्य सन्मान आणि सुरक्षा देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. . महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांसाठी आयोजित भव्य संयुक्त लाभ वितरण मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

Pune Tempo Submerged Tunnel Rescue; Traffic Police Save Driver

मुसळधार पावसामुळे पुणे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असताना सोमवारी दुपारी बोपोडी परिसरात थरारक घटना घडली. पाण्याने भरलेल्या भुयारी मार्गात एक टेम्पो शिरल्यानंतर तो जोरदार प्रवाहात वाहून जाऊ लागला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प . साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट भुयारी मार्गात गेल्या काही दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस सुरू असून…

Read More

Motorists stranded on highways due to repair work, taking 10 to 15 minutes to travel 1 km, police failing to break the gridlock

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सध्या वेगात सुरू असले, तरी नियोजनाच्या अभावामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या एका बाजूचे डांबरीकरण टप्प्याटप्प्याने केले जात असल्याने, दुसऱ्या बाजूने एकेरी वा . शहराच्या हद्दीत असलेल्या या मार्गावरील दुभाजकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना रस्त्याच्या मध्योमध सिमेंट काँक्रिटची मोठी…

Read More

Heavy Rain Cyclone Diverts to Surat-Akole; Dam Water Levels Rise in Nashik

नाशिककरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याने नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात तब्बल ३५० मिलीमीटर पावसाचा, म्हणजेच ‘ढगफुटी’चा धडकी भरवणारा इशारा दिला होता. मात्र, पालघरमध्ये हाहाकार उडवणारा पावसाचा ‘भोवरा’ ऐनवेळी नाशिकच्या वेशीवरून दुसरीक . असा टळला नाशिकवरील धोका… पालघर जिल्ह्यात तब्बल ४५० मिमी पावसाची नोंद करणारा हवामानातील तोच ‘भोवरा’ सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे सरकण्याचा अंदाज…

Read More

पूरग्रस्त वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय!:पुणे महापालिकेच्या तब्बल 101 शाळांना रविवारपर्यंत सुट्टी; राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था

आळंदी आणि देहू परिसरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हजारो वारकरी अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेत शहरातील महापालिकेच्या 101 शाळा वारकऱ्यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आजपासून थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या इतर शाळा तसेच सर्व खासगी शाळा नियमित सुरू राहणार असल्याचे…

Read More

'बॉस'चा DP अन् 5.30 कोटींचा गंडा:अकाऊंटंटला मेसेज करून करोडोंची फसवणूक, सायबर पोलिसांकडून पुण्यातून आरोपीला बेड्या

राजस्थान पोलिसांच्या राज्य सायबर क्राईम शाखेने कॉर्पोरेट कंपन्यांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश करत महाराष्ट्रातील पुणे येथून एका आरोपीला अटक केली आहे. सायबर ठगांनी एका नामांकित कंपनीच्या चेअरमनच्या व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटो (डीपी) आणि नावाचा वापर करून कंपनीच्या अकाउंटंटला फसवले आणि दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 5 कोटी 30 लाख रुपये…

Read More

आषाढी एकादशीसह गुरू पौर्णिमेचे लागले वेध:आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा केली जाणार साजरी‎

आषाढी एकादशीला भू-वैकुंठ पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची ओढ सर्व वारकरी, भाविकांना लागली आहे. यात मध्यमवयीनांसह बहुतेक ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला भाविकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी आटोपली की, गुरू पौर्णिमा साजरी होणार आहे. यासाठी शहरात आतापासूनच नागरिकांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. अगदी विठूरायाचे नामस्मरण करण्यासाठी टाळ, मृदुंग, विणा, ढोलकी, तबला दुरुस्त किंवा खरेदी…

Read More