Headlines

सातारा LCB तील ‘स्थायी’ कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी आंदोलन:आर्थिक व्यवहारांचे आरोप; पोलिस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) मधील काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत राहून मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीसह तात्काळ बदलीची मागणी भारतीय स्वाभिमानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुषार विजय मोतलिंग यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नाट्यमय आंदोलन छेडले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता:आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दलची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे. मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय…

Read More

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच कोसळली:राडारोडा हटवून वाहतूक पूर्ववत; 'एमएसआरडीसी'ची माहिती

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाजवळ सोमवारी सकाळी दरड कोसळली. ही घटना पूर्णपणे नैसर्गिक असून, बोगद्याच्या कामाच्या गुणवत्तेशी किंवा तांत्रिक त्रुटीशी तिचा संबंध नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी स्पष्ट केले. लोणावळा परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या विक्रमी पावसानंतर सोमवारी सकाळी मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळली. डोंगरावरून…

Read More

राज्यात अतिवृष्टीने 9 बळी:मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य…

Read More

'साताऱ्यातील संवेदनशील भागातील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करा':पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रशासनाला सतर्कतेचे आदेश

राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी सुरू असून सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे, या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क राहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरित केलेल्या नागरिकांना अन्न, शुद्ध पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासनाने दक्षता घ्यावी….

Read More

लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू:अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मुंबई आणि पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या संततधार पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:पुण्यात संशयित आरोपी सियाच्या घराबाहेर गुलाबो गँगचे 'जोडे मारो' आंदोलन, निष्पक्ष तपासाची मागणी

पुण्यात केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी आणि निष्पक्ष तपासाच्या मागणीसाठी सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’, ‘गुलाबो गँग’ आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी सिया गोयल हिच्या मार्केट यार्ड येथील लीलाकुंज निवासस्थानाबाहेर ‘जोडे मारो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी आरोपी सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांच्या कथित वर्तनावर तीव्र संताप…

Read More

पावसाळी पर्यटनात जीव धोक्यात घालू नका!:राजगड–सिंहगड परिसरासाठी वन विभागाचा महत्त्वाचा इशारा

पुणे वन विभागाने पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राजगड, सिंहगड, लोणावळा परिसरासह अनेक पर्यटनस्थळांवर पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी काही धोके निर्माण झाले आहेत. यामध्ये दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडांच्या फांद्या तुटणे, तसेच धबधबे, ओढे आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढणे यांसारख्या घटनांचा…

Read More

आषाढी वारीवर पावसाचे संकट:आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन; पुणे-मुंबई एसटी सेवा बंद, धरणांत वाढू लागला पाणीसाठा

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक…

Read More

मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा:दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुंबईतील दुर्घटनांवर सरकारला धारेवर विधानसभेचे…

Read More