Headlines

बागलाणमध्ये 3 लाख मतदारांची होणार पडताळणी:288 बीएलओ व 288 सहाय्यक नियुक्त; 7 ऑक्टोबरपर्यंत राबवणार उपक्रम‎

राज्यात ३० जूनपासून सुरू झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला बागलाण तालुक्यात प्रारंभ झाला असून, तालुक्यातील तब्बल ३,००,१७९ मतदारांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. यासाठी २८८ बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) व २८८ बीएलओ सहाय्यक नियुक्त करण्यात आले असून त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून रोजी सटाणा येथील डिव्हाईन विद्यालयात…

Read More

हेमंत भावसार यांनी दुचाकीवर गाठले लडाख:6,434 किमीचा प्रवास; उमलिंग-ला मार्ग गाठत साकारले अनेक वर्षांचे स्वप्न‎

येथील दुर्गा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तथा भावसार ऑप्टिशियनचे संचालक हेमंत रविंद्र भावसार यांनी दुचाकीवर प्रवास करून लडाखची ‘सोलो’ मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल ६,४३४ किलोमीटरचा खडतर प्रवास करत त्यांनी जगातील सर्वाधिक उंचीवरील रस्त्यांपैकी एक असलेल्या उमलिंग-ला मार्गावरून प्रवास करून अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. भावसार यांना मोटारसायकल भटकंतीची विशेष आवड आहे. १५ जून…

Read More

आज हिंगोलीत रिंगण:नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचे‎प्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार‎

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या‎नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्या‎पायी पालखी सोहळयाचे रविवारी पंढरपूरकडे‎प्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविक‎पालखी सोहळ्यात सहभागी झाले. आज‎हिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे,‎पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. ३५० किमी अंतर‎पायी कापून २४ जुलैला पालखी पंढरपूरला‎पोहोचणार आहे.‎ नर्सी नामदेव येथून दुपारी ‘जय जय रामकृष्ण‎हरी’च्या गजरात पालखी निघाली. यावेळी‎संस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन…

Read More

विठ्ठलनामाचा गजर:7 जुलै रोजी पंढरपूरकडे पालखीचे होणार प्रस्थान‎, पैठण येथील पालखी ओट्याची स्वच्छता

संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांच्या ४७१ व्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, येथील पालखी ओटा परिसराची रविवारी नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पुढाकाराने संपूर्ण पालखी स्वच्छ करण्यात आला. ही मानाची पालखी मंगळवारी (७ जुलै) रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी हा पैठणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा…

Read More

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न‎

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित‎दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर‎‎जिल्ह्यातील जेवळी येथील‎‎प्रगतिशील शेतकरी अमृत‎‎गंपले यांनी अवघ्या २०‎‎गुंठ्यांत ९०० वांग्याच्या‎‎रोपांची लागवड करून‎‎केवळ नऊ महिन्यांत सुमारे‎‎६ लाख रुपयांचे उत्पादन‎‎मिळवले. यात दीड‎लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे‎निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. गंपले‎यांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वी‎ते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिक‎पिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च,‎अनियमित…

Read More

विवाहित असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा?:ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची ठाणे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जानेवारी २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची आणि या तरुणाची मैत्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप होता. काही काळानंतर तरुणाने आपण आधीच विवाहित…

Read More

कामगार कल्याण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन:मान्यवरांची व्याख्याने, वृक्षारोपण; गुणवंत कामगारांचा सत्कारही झाला

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७३ वा वर्धापन दिन स्थानिक कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे, मान्यवरांच्या व्याख्यानांचे आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम कामगार कल्याण मंडळाच्या रामनगर येथील ललित कला भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्याला युवा स्वाभिमान पक्षाचे सुनीलभाऊ राणा, अमरावती महानगरपालिकेच्या…

Read More

माजी पंतप्रधान चंद्रशेखर जन्मशताब्दीनिमित्त परिसंवादास चांगला प्रतिसाद:अरुण श्रीवास्तव: समाजवादी विचार पुढे नेण्याची आज गरज

माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात ‘चंद्रशेखर: विचार आणि सद्यस्थिती’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ समाजवादी नेते अरुणकुमार श्रीवास्तव यांनी समाजवादी विचार पुढे नेण्याची आज कधी नव्हे इतकी गरज असल्याचे मत व्यक्त केले. एस. एम. जोशी फाऊंडेशन, नवी पेठ, पुणे येथे रविवारी हा परिसंवाद पार पडला. कार्यक्रमाच्या…

Read More

गारपीटग्रस्त कांदा, केळी उत्पादक मदतीच्या प्रतीक्षेत:2 महिन्यांनंतरही नुकसानभरपाई मिळाली नाही

अंजनगाव बारी परिसरातील कांदा आणि केळी उत्पादक शेतकरी मे महिन्यात झालेल्या वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. पंचनामे पूर्ण होऊन दोन महिने उलटले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी निखिल श्रीकृष्ण भोपळे यांच्या दोन एकरांतील सुमारे…

Read More

तळेगावात रस्त्यावर पाणी, रस्ता खचला:पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीदरम्यान घडली घटना

तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचल्याच्या घटनेनंतर तळेगाव नगर परिषदेने खुलासा केला आहे. ही घटना पाणीपुरवठा योजनेच्या नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडली, असे नगर परिषदेने स्पष्ट केले. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका आणि वितरण नलिका टाकण्याची कामे झाली आहेत. या योजनेतील संभाजीनगर येथील नव्याने बांधलेल्या पाण्याच्या…

Read More