Headlines

राम मंदिरात दरोडा टाकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?:खासदार संजय राऊत यांचा भाजपवर घणाघाती हल्ला

मतदारसंघांच्या पुनर्रचना विधेयकासाठी (डिलिमिटेशन बिल) आवश्यक असलेला बहुमताचा आकडा भाजप सरकार कितीही पक्ष आणि खासदार फोडले तरी गोळा करू शकत नाही, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, अयोध्येतील राम मंदिराच्या नावावर भाजपच्याच लोकांनी मोठी लूट केली असून, या कथित घोटाळ्याविरोधात आजपासून शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणूक:खासदार कल्याण काळे विजयी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी विजय मिळवला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बिगर शेती मतदारसंघात खासदार कल्याण काळे यांनी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. या मतमोजणीत कल्याण काळे यांना तब्बल 48 मते मिळाली,…

Read More

वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.24 लाखांचा मुद्देमाल जप्त:हिंगोलीच्या मकोडी शिवारातील घटना, तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील मकोडी शिवारात सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 24.24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. 5 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाभरात अवैधवाळू उपसा व वाहतूक बंद करण्यासाठी पोलिस दलाची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस अधिक्षक डॉ….

Read More

"विदर्भ चेंबर पत्रिका’ भविष्याचा दस्तऐवज:गुप्ता यांचे प्रतिपादन; खा. धोत्रेंसह मान्यवरांची उपस्थिती‎

गत ९३ वर्षांची गौरवशाली परंपरा व व्यापारी-उद्योग क्षेत्राची अविरत सेवा या संकल्पासह विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अकोला यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये चेंबरचे मुख्य मुखपत्र असणाऱ्या “विदर्भ चेंबर पत्रिके’चे प्रकाशन करण्यात आले. स्थानिक पोलिस लॉन येथे झालेल्या या कार्यक्रमात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महासचिव तथा दिल्लीचे खासदार प्रवीण खंडेलवाल, कैटचे राष्ट्रीय अध्यक्ष…

Read More

नरसिंग महाराज मंदिरासमोर साचले पाणी‎:अकाेटच्या ग्रामदैवताकडे दुर्लक्ष; पटांगणाच्या निकृष्ट कामामुळे परिसराला तलावाचे स्वरूप‎

अकोट नगरीचे आराध्य व ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिराचे सौंदर्य आणि पावित्र्य नेहमीच भाविकांना आकर्षित करत आले. मात्र, सध्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा व नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पवित्र परिसराची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मंदिरा . मंदिरासमोरील पटांगणाचे काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराने योग्य उतार दिला नाही. तसेच पाणी निचऱ्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था केली नाही. परिणामी, प्रत्येक पावसानंतर…

Read More

कृउबासच्या उपसभापतिपदी अर्चना कणसे बिनविरोध:सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत नवा इतिहास रचला गेला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. अर्चना कणसे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अलिकडेच एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विहित मुदतीत अर्चना…

Read More

आषाढीत पहिल्यांदाच ‘एअर ॲम्बुलन्स'ची सुविधा:आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतला आढावा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 3097 डॉक्टरांचे पथक तैनात‎

प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच यंदा यात्रा काळात आरोग्य विभागाकडून ३ हजार ९७ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…

Read More

योजनांचा लाभ न मिळणाऱ्या रूग्णांवर धर्मादायमध्ये मोफत उपचार करणार:आमदार अभिजीत‎ पाटील यांची ग्वाही‎

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पात्र न ठरणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. परंतु ज्या गरजू रूग्णांना या दोन्ही मदतीचे लाभ मिळत नाहीत अशा रूग्णांना डॉक्टरांनी धर्मादाय रुग्णालयांमध्ये रेफर केल्यास आपण त्यांच्या मोफत इलाजाची सोय करून देणार असल्याची ग्वाही माढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. ते माढा येथील डॉ…

Read More

वाढीव करावर श्रीरामपूरकर संतापले:आज शहर बंदची हाक, चुकीची घरपट्टी किंवा व्यावसायिक कर आकारला तर तत्काळ हरकत घ्या‎

वाढीव कराबाबत सध्या नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कर वसुलीत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही नागरिकांनी आपल्या हरकती विहित मुदतीत नगरपरिषद कार्यालयाकडे जमा कराव्यात असे आवाहन नगराध्यक्ष करण ससाणे आणि मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांनी केले आहे. नगराध्यक्ष करण ससाणे आणि मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सांगितले की सदर वसुली ही शासनाच्या निर्देशानुसार होत आहे की…

Read More

लासलगाव बाजार समिती सभापती आणि उपसभापती निवड 11 जुलैला:सभापतिपदासाठी जयदत्त होळकर यांचे नाव चर्चेत‎

लासलगाव लासलगाव बाजार समिती सभापती व उपसभापती पदाकरिता दि. ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता संचालक मंडळाची बैठक होणार आहे. सभापती पदासाठी जयदत्त होळकर यांचे नाव चर्चिले जात आहेत. तत्कालीन सभापती डी. के. जगताप व उपसभापती संदीप दरेकर यांनी आवर्तन पद्धतीनेनुसार पदांचे राजीनामे दिल्यानंतर आता ही निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बैठकीसाठी निफाडचे सहाय्यक निबंधक…

Read More